

रायगड : भाजपा राष्ट्रवादी यूतीला बहूमत मिळालेले असून आम्ही जिल्हा परिषदेत सत्तास्थापन करु असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार सूनील तटकरे यांनी व्यक्त केला आहे.
आम्ही यूती केल्ल्या ठिकाणी 37 जागा निडून आलेल्या आहेत. त्यामुळे सत्तास्थापनेला आम्हीला कोणतीही अडचण नाही, असेही तटकरे म्हणाले. दरम्यान शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनीही भाजपा आमच्या सोबत येईल असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे भाजपा कोणत्या मित्रपक्षाला झुकतेमाप देणार याकडे रायगडवासीयांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी पाच पाच पंचायत समीत्या मिळाल्या आहेत. यामद्ये शिवसेनेला महाड, पोलादपूर, माणगाव, अलिबाग, मुरुड या पंचायत समीती बहुमत मिळाल्याने त्यांच्या पक्षाचे सभापती, उप सभापती बसणार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसला रोहा, तळा, म्हसळा, श्रीवर्धन,कर्जतमध्ये बहूमत मिळाले आहे. त्याचा सभापती येथे बसणार आहे. तर भाजपाला पेण, पनवेल, खालापूर, सुधागड येथे भाजपाला सभापती बसवण्याची संधी आहे. तर महाविकास आघाडीला एकमेव उरण पंचायत समीता मिळाली आहे.
परिणामी रायगडच्या सत्ता समिकरणामध्ये शिवसेना राष्ट्रवादी असा पालकमंत्री पदावरुन सूरु झालेला संघर्ष, भविष्यात आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.