Raigad yellow watermelon : रायगडात पिकली पिवळी कलिंगडे

आरोही वाण ठरतोय आकर्षणाचे केंद्र; कलिंगड तोडणीचा आनंद घेता येणार थेट शेतातून
Raigad yellow watermelon
रायगडात पिकली पिवळी कलिंगडेpudhari photo
Published on
Updated on

सुधागड : संतोष उतेकर

उन्हाळ्याची चाहूल लागताच बाजारात लालचुटूक कलिंगडे दिसू लागतात, मात्र रायगड जिल्ह्यातील घोसाळे किल्ल्याच्या परिसरात यंदा काहीतरी वेगळे पाहायला मिळत आहे. येथील शेतात चक्क आरोही नावाचे पिवळा गर असणारे वैशिष्ट्यपूर्ण कलिंगड डोलत असून, पर्यटकांना आणि खवय्यांना हे कलिंगड थेट शेतातून स्वत:च्या हाताने निवडून खुडण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

वरतून इतर कलिंगडांसारखेच हिरवे दिसणारे हे फळ कापल्यानंतर आतून गडद पिवळ्या रंगाचे निघते. दिसायला आकर्षक आणि चवीला अधिक गोड असलेल्या या वाणाची लागवड येथील शेतकरी ऋषिकेश म्हात्रे व प्रवीण म्हात्रे यांनी प्रायोगिक तत्त्वावर यशस्वी केली आहे. केवळ बाजारात मिळणारे फळ विकत न घेता, ग्राहकांनी सहकुटुंब शेतात यावे, फिरण्याचा आनंद घ्यावा आणि हवे ते फळ स्वत: निवडावे, ही संकल्पना येथे राबवली जात आहे.

Raigad yellow watermelon
Girgaon Shobha Yatra : गिरगावातल्या शोभायात्रेला लाखोंची गर्दी

रायगड जिल्ह्यात प्रामुख्याने अलिबाग, पेण आणि रोहा परिसरात मोठ्या प्रमाणात तसेच इतरही ठिकाणी लाल कलिंगडाची लागवड होते. मात्र, स्वत: निवडा आणि तोडा ही संकल्पना आणि आरोही (पिवळे कलिंगड) या वाणाची लागवड जिल्ह्यात अत्यंत मर्यादित ठिकाणी किंवा दुर्मिळ आहे.

Raigad yellow watermelon
Thane New Year Swagat Yatra : ठाण्यात स्वागतयात्रांचा जल्लोष...

बहुतेक शेतकरी आपला माल घाऊक व्यापाऱ्यांना विकतात. मात्र थेट ग्राहकांना शेतात बोलावून विक्री केल्यामुळे शेतकऱ्याला चांगला भाव मिळेल. आणि पर्यटनालाही चालना मिळणार आहे. घोसाळे किल्ल्याच्या परिसरात होणारा हा प्रयोग जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांसाठी कृषी-पर्यटनाचा एक नवीन आदर्श ठरू शकतो.

पिवळ्या कलिंगडाचे महत्त्व

पिवळ्या कलिंगडाची चव ही लाल कलिंगडापेक्षा किंचित वेगळी आणि अधिक मधूर असते. याचा गर लाल कलिंगडाच्या तुलनेत अधिक मऊ आणि रसाळ असतो. यामध्ये बीटा-कॅरोटीन भरपूर प्रमाणात असते, जे शरीरात व्हिटॅमिन ए तयार करण्यास मदत करते. तसेच हे अँटी-ऑक्सिडंट्सचा उत्तम स्रोत आहे. हे वाण सामान्य बाजारपेठेत सहज उपलब्ध होत नाही. पिवळ्या कलिंगडांमध्ये बियांचे प्रमाण लाल कलिंगडापेक्षा कमी असते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news