

पोलादपूर : पावसाळा सुरू होण्यास अजून महिनाभराचा अवकाश आहे. परंतु पावसाळ्यासाठी लागणारे बेगमीचे साहित्य खरेदीसाठी ग्राहकांची दुकानातून गर्दी करताना दिसून येते.
बाजारातून कांदे, बटाटे, लसूण, मसाल्याचे पदार्थ शिवाय सुक्या मासळीच्या खरेदीवर सर्वसामान्यांचा विशेष भर आहे. दरवर्षी महाड बाजारपेठ व तालुक्यात देशी कडधान्यांची लाखो रुपयांची उलाढाल केवळ दोन महिन्यांतच होत असते. कडधान्यांमध्ये महाडचा वाल, नरवणची चवळी, गोरेगावचे मूग व महाडची मटकी प्रसिद्ध आहे. सर्व कडधान्यांची मिळून 60 ते 70 टनाची विक्री होत असते. कडधान्यांमध्ये सर्वाधिक पसंती व विक्री वाल व मटकीची होत असते.
सद्य स्थितीत उष्मा वाढत असल्याने दुपारी बाजारपेठमध्ये सामसूम दिसून येत असली तरी अनेक व्यवसाईक ग्रामीण भागात साहित्य घेऊन जात गावागावात विक्री करत आहेत. महाडसह पोलादपूर तालुक्यात कडधान्य मोठ्या प्रमाणावर पिकवले जात असल्याने कडधान्य सुद्धा बाजारात विक्रीसाठी आले आहे. बाजारपेठ मध्ये सद्यस्थितीत घरगुती साहित्य खरेदीसाठी ग्राहक बाजारात येत असल्याचे पाहवयास मिळत आहेत. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्या पासून मेच्या पहिल्या आठवड्यात सर्वसाधारणपणे महिलावर्ग मसालेसह कडधान्याची खरेदी करत असतात. त्याचप्रमाणे तयार तिखटच्या ऐवजी मिरची खरेदी करत त्याचे तिखट बनविण्यात येत असते.
ग्राहकवर्ग पावसाळ्यातील व त्या पुढील साधारणपणे तिन ते चार महिने पुरेल असा साठा करुन ठेवतो़ व चार महिने या वस्तूंचा आस्वाद घेत असतो उन्हाळ्याचा हा काळे मसाले तयार करण्याचा असतो. त्यासाठीचे घटक पदार्थ काही प्रमाणात उपलब्ध आहेत. मार्केटमध्ये घाट माथ्यावरून लसूण सह कांदा उत्पादक थेट वाहनातून गावागावात विक्री करत असल्याने अनेक ग्राहक त्या उत्पादकांकडून कांदा लसूणसह इतर साहित्य खरेदी करत आहेत, शहरातील ग्राहक महिन्याच्या महिन्याला लागेल तेवढं साहित्य खरेदी करत आहेत.
दुकानातून विविध प्रकारचे मसाले विक्री उपलब्ध असले तरी तिखट शक्यतो घरीच तयार केले जाते. शिवाय पावसाळ्यासाठी लागणारे कडधान्य खरेदी करून ते वाळवून ठेवण्यात येते. कडकडीत उन्हात वाळवल्यानंतर शक्यतो कीड न धरता टिकून राहते. याशिवाय वाढत्या दरामुळे पावसाळ्यापूर्वी खरेदी सोयीस्कर ठरत आहे. बाजारातील पापड महाग पडत असल्याने पापड पीठ आणून घरात पापड करणेदेखील सोयीस्कर पडत आहे.
पावसाळ्यात शेती हंगामात न मिळणार्या वस्तू व त्यावेळेस सार्याच वस्तूंचे भाव चढे असल्याने पावसाळयासाठी व दैनंदिन आहारातील वस्तूंची साठवण करण्याठी ग्रामीण भागातील शेतकरी सह इतर ग्राहक बाजारातमध्ये दाखल होत असून कांदा, बटाटा व लसूण, तिखट मिरची, हळद आणि कडधान्य खरेदी करतांना दिसत आहेत़ कांद्याच्या गोण्याच्या गोण्या खरेदीकरीतांना दिसत आहे. एकदा का पावसाळयात शेती हंगाम चालू झाल्यावर (खरेदी) करण्यास वेळ मिळत नसल्याने आगोटची खरेदी केली जात आहे़ त्याचप्रमाणे सुकी मासळी खरेदी करतात या खरेदीला अगोट संबोधले जाते.