Raigad Watermelon: रायगडमध्ये कलिंगड उत्पादनात 50 टक्के घट; अवकाळी पावसाचा मोठा फटका

ऑक्टोबरमधील अवकाळी पावसामुळे लागवड लांबली; अलिबाग, रोहा, माणगाव परिसरात उशिराने बाजारात दाखल झाले कलिंगड
Raigad Watermelon
Raigad WatermelonPudhari
Published on
Updated on

रायगड : गेल्या वर्षी लांबलेल्या पावसाने कलिंगड पिकावरही परिणाम झाला आहे. यावर्षी कलिंगड पिक उशिराने दाखल झाले आहे. जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये ठिकठिकाणी कलिंगड विक्रीची दुकाने सजू लागली आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून कलिंगडचा हंगाम सुरु झाला आहे. मात्र यंदा कलिंगडच्या उत्पादनात 50 टक्के घट झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान उष्णता वाढल्यात उरलेल्या पिकावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Raigad Watermelon
Mumbai Pune Expressway: मुंबई–पुणे एक्स्प्रेसवे टोल परतावा : 1.2 लाख वाहनधारकांना 5.16 कोटींचा दिलासा

ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे उत्पादनावर परिणाम झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. पावसाचा हंगाम संपल्यावर रायगड जिल्ह्यातील अलिबागसह रोहा, माणगाव अशा अनेक तालुक्यांमध्ये कलिंगडचे उत्पादन घेतले जाते. कमी कालावधीत जास्त उत्पादन देणारे आणि अधिक मागणी असणाऱ्या या पिकाची लागवड करण्यावर अधिक भर दिली जात आहे. आंब्या बरोबरच कलिंगड लागवड ठिकठिकाणी केली जाते. डिसेंबरला तयार होऊन कलिंगड बाजारात दाखल होतो.

Raigad Watermelon
Gold Price Surge: लगीनसराईत सोन्याचा दर 1.57 लाखांवर; सराफा बाजारात खरेदी मंदावली

परंतू यावर्षी पावसाचा हंगाम वाढला. ऑक्टोबर महिन्यात अवकाळी पाऊस पडल्याने कलिंगडची लागवड ही लांबणीवर गेली. त्याचा उत्पादनावर परिणाम झाला. त्यामुळे यंदा बाजारात फक्त 50 टक्के उत्पादन तयार झाले आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात कलिंगड बाजारामध्ये दाखल झाले आहे. ठिकठिकाणी कलिंगड विक्रीची दुकाने सजली आहे. लहान आकारापासून मोठ्या आकाराचे कलिंगड विक्रीसाठी ठेवले जात आहे. अलिबाग रोहा मार्गासह पेण-अलिबाग, रोहा- महाड, रेवदंडा-मुरुड अशा अनेक मार्गावर नाक्या नाक्यावर कलिंगड विक्रीची दुकाने सजली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news