Raigad Water level | सुधागड तालुक्यातील ढोकशेत धरणाने गाठला तळ, रायगड जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ २५.४५ टक्के पाणीसाठा!

जिल्ह्यातील २८ धरणांपैकी ९ धरण क्षेत्रात १५ टक्क्यापेक्षा कमी पाणीसाठा, गेल्या वर्षी याचवेळी २८.६ टक्के पाणीसाठा
Raigad Water crisis
Raigad Water crisis
Published on
Updated on

महादेव सरसंबे

रोहे : यावर्षी उन्हाळा कडक असल्याने सर्वत्र उन्हाची छळ लागत आहे. याचा फटका रायगड जिल्ह्यातील धरण क्षेत्रालाही बसला आहे. रायगड जिल्ह्यातील रायगड पाटबंधारे विभाग अंतर्गत येत असलेल्या २८ धरण क्षेत्रात २५.४५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. तर गेल्या वर्षी याच वेळी २८.३६ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. त्यामुळे गेल्या वर्षापेक्षा यावर्षी २.९१ टक्के कमी पाणीसाठा उपलब्ध आहे. अजूनही जवळपास एक महिना पावसाला शिल्लक असल्याने पाणी जपून वापरण्याची गरज आहे.

रायगड जिल्ह्यातील २८ धरण क्षेत्रातील पाणीसाठा पाहता यामध्ये मुरुड तालुक्यातील फणसाड धरणक्षेत्रात ११ टक्के पाणीसाठा उपलब्ध, तळा तालुक्यातील वावा धरणक्षेत्रात ६० टक्के पाणीसाठा उपलब्ध, रोहा तालुक्यातील सुतारवाडी धरणक्षेत्रात ४८ टक्के पाणीसाठा उपलब्ध, पेण तालुक्यातील आंबेघर धरणक्षेत्रात ४९ टक्के पाणीसाठा उपलब्ध, अलिबाग तालुक्यातील श्रीगांव धरणक्षेत्रात १७ टक्के पाणीसाठा उपलब्ध, सुधागड तालुक्यातील कोंडगाव धरणक्षेत्रात १४ टक्के पाणीसाठा उपलब्ध, घोटवडे धरणक्षेत्रात ४ टक्के पाणीसाठा उपलब्ध, ढोकशेत धरणक्षेत्रात ० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

कवेळे धरणक्षेत्रात ११ टक्के पाणीसाठा उपलब्ध, उन्हेरे धरणक्षेत्रात ४ टक्के पाणीसाठा उपलब्ध, श्रीवर्धन तालुक्यातील कार्ले धरणक्षेत्रात ३५ टक्के पाणीसाठा उपलब्ध,कुडकी धरणक्षेत्रात ३४ टक्के पाणीसाठा उपलब्ध, रानीवली धरणक्षेत्रात १० टक्के पाणीसाठा उपलब्ध, म्हसळा तालुक्यातील पाभरे धरणक्षेत्रात ९ टक्के पाणीसाठा उपलब्ध, संदेरी धरणक्षेत्रात ४१ टक्के पाणीसाठा उपलब्ध, महाड तालुक्यातील वरंध धरणक्षेत्रात ३३ टक्के पाणीसाठा उपलब्ध, खिंडवाडी धरणक्षेत्रात ३६ टक्के पाणीसाठा उपलब्ध,कोथुर्डे धरणक्षेत्रात २५ टक्के पाणीसाठा उपलब्ध, खैरे धरणक्षेत्रात ३१ टक्के पाणीसाठा उपलब्ध, कर्जत तालुक्यातील साळोख धरणक्षेत्रात २१ टक्के पाणीसाठा उपलब्ध, अवसरे धरणक्षेत्रात १९ टक्के पाणीसाठा उपलब्ध, खालापूर तालुक्यातील भिलवले धरणक्षेत्रात ४२ टक्के पाणीसाठा उपलब्ध, कलोते मोकाशी धरणक्षेत्रात ३६ टक्के पाणीसाठा उपलब्ध, डोणवत धरणक्षेत्रात २५ टक्के पाणीसाठा उपलब्ध, पनवेल तालुक्यातील मोरबे धरणक्षेत्रात ४३ टक्के पाणीसाठा उपलब्ध, बामणोली धरणक्षेत्रात ९ टक्के पाणीसाठा उपलब्ध, उसरण धरणक्षेत्रात ३७ टक्के पाणीसाठा उपलब्ध, उरण तालुक्यातील पुनाडे धरणक्षेत्रात १० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

दरम्यान दरवर्षी मे महिन्यामध्ये पाणीसाठा कमी उपलब्ध होत असल्याचे दिसून येते. वृक्षतोड व पर्यावरणाचे हानी याला कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. रायगड जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस दरवर्षी पडत असतो. परंतु त्या पावसाचे पाणी भविष्याच्या दृष्टिकोनातून साठवण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा नसल्याचे दिसून येते. रायगड जिल्ह्यात पडणारा पाऊस थेट नदीद्वारे समुद्राला मिळत असल्याचे दिसून येते. त्यामुळे रायगड जिल्ह्यात उन्हाळ्यात काही गावांना पाणीटंचाई भासत असल्याचे दरवर्षी चित्र दिसून येते. भविष्याचा विचार करता रायगड जिल्ह्यात पाणी साठवण्याची आवश्यकता आहे यासाठी शासनाने ठोस उपाय योजना करण्याची आवश्यकता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news