Raigad | महामार्गावरील खड्ड्यात बस आपटून दोन विद्यार्थी जखमी

डोक्यासह पायाला दुखापती; आमटेम ते नागोठणे प्रवास करणारे विद्यार्थी
bus accident mumbai gao mahamarg
महामार्गावरील खड्ड्यात बस आपटून दोन विद्यार्थी जखमीpudhari photo
Published on
Updated on

नागोठणे : खड्डेयुक्त मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी (2 सप्टेंबर) एसटी बस खड्ड्यात आपटल्याने बसमध्ये प्रवास करणारे दोन विद्यार्थी जखमी झाले आहेत. अपघाताचे वृत्त येताच विद्यार्थ्यांचे नातेवाईक व पालकांनी एसटी स्थानक व रुग्णालयात गर्दी केली होती.

पनवेलवरुन सुटलेली एसटी बस बाळू शिवाजी फड चालवीत होते. पनवेल- रोहा ही एसटी बस सोमवारी प्रवाशी घेऊन येत असता दुपारी 12.15 वा.च्या सुमारास नागोठणे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल कामथ येथे आली असता रस्त्यांवरील खड्यामध्ये जोरात आदळली. त्यामुळे आमटेम ते नागोठणे असा प्रवास करीत बसच्या मागील सीटवर बसलेले आर्य नारायण मोकल व राज तुकाराम मोकल या दोन विद्यार्थ्यांच्या डोक्याला दुखापत होऊन जखमी झाले आहेत. त्यांना नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करण्यात आले. अधिक तपासणी व उपचारासाठी विद्यार्थ्यांना पेणकडे रवाना करण्यात आले. अपघात झाल्याचे समजताच काळजीत असलेले जखमी विद्यार्थ्यांचे नातेवाईक, पालक व नागरिकांनी नागोठणे एसटी स्थानक व रुग्णालयात गर्दी केली होती.

नादुरुस्त मुंबई-महामार्गामुळे सर्वच प्रकारच्या वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यातून विद्यार्थ्यांनाही त्रात होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news