

कोलाड ः मुंबई-गोवा महामार्गावरील पुई गावाच्या हद्दीत पुई थांब्याजवळ कारची कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक झाली. या अपघातात दोघे ठार तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. हा भीषण अपघातशनिवारी (13 डिसेंबर) सकाळी 7.15 मिनिटांनीघडला. या अपघातात ओवेस सज्जाद सरखोत, सज्जाद अब्दुल सखुर सरखोत, दोघेही रा. वणी ता. माणगांव हे दोघ ठार तर हुसबान अब्दुल हमीद कारविनकर रा. आंबेत व सरजित सज्जाद सरखोत रा. वणी ता. माणगांव हे दोघ जखमी झाले.
कंटेनर हा मुंबईकडून कोलाड बाजुकडे येत होता. तो पुई बसथांब्याजवळ आला असता पाठीमागून कोलाड बाजुकडे जाणाऱ्या गाडीवरील चालक हुसबान अब्दुल हमीद कारविनकर यांने अतिवेगाने गाडी चालवित पाठीमागून कंटेरनला जोराची धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती ती कारचा पुरता चक्काचूर झाला. त्यात दोघेजणजागीच ठार झाले. तर अन्य दोघे जखमी झाले. यामुळे वाहतूकही काही काळ ठप्पझाली होती.
अपघाताची माहिती मिळताच कोलाड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत रेस्क्यू टीमच्या मदतीने मदतकार्य सुरू केले. जखमींना कोलाडच्या प्राथमिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघाताची नोंद कोलाड पोलिसात करण्यात आली आहे.