

महाड : मागील आठवड्यात माजी खासदार रायगड प्राधिकरण चे अध्यक्ष संभाजी राजे छत्रपती यांनी हिंदवी स्वराज्याची राजधानी असणार्या किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी नजीक असलेल्या वाघ्या कुत्र्याची समाधी एक मे पूर्वी हटवण्याबाबत केलेल्या मागणी संदर्भात महाड मधील कोकणकडा मित्र मंडळाच्या वतीने आज उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या महाड दौर्याप्रसंगी निवेदन देण्यात आले.
या निवेदनामध्ये मागील स्वातंत्र्यपूर्व काळापासून असलेल्या व शंभर वर्षापेक्षा जास्त नोंद असलेल्या वाघ्या कुत्र्यासंदर्भात अनेक ऐतिहासिक संदर्भ अनेक मान्यवरांनी याबाबतची आपली माहिती पुस्तकात प्रसिद्ध केल्याचे नमूद करण्यात आले व कोणत्याही परिस्थितीमध्ये शासनाने वाघ्या कुत्र्याचा पुतळा किल्ले रायगडावरून हटवू नये अशी आग्रही मागणी करण्यात आली.
हिंदवी स्वराज्याची राजधानी असणार्या रायगड किल्लावरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाबाबत महाराष्ट्र राज्याचे मंत्री ना.चंद्रकांत पाटील आणि मंत्री भरतशेठ गोगावले यांना निवेदन देताना स्थानिक कोकण कडा मित्र मंडळाचे अध्यक्ष सुरेश पवार, कार्याध्यक्ष नितीन पावले, रोहित पवार, सिद्धेश पाटेकर, राजू पावले आदि प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
हिंदवी स्वराज्याची राजधानी असणार्या रायगड किल्लावरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाबाबत महाराष्ट्र राज्याचे मंत्री ना.चंद्रकांत पाटील आणि मंत्री भरत गोगावले यांना निवेदन देताना स्थानिक कोकण कडा मित्र मंडळाचे अध्यक्ष सुरेश पवार, नितीन पावले, आदि पदाधिकारी उपस्थित होते.