

अलिबाग ः रायगडातील दहा नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी (2 डिसेंबर) मतदान झाले.मात्र,न्यायालयीन आदेशाने मतमोजणी पुढे ढकलली गेल्याने उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.या सर्व ईव्हीएम आता 21 डिसेंबरला उघडल्या जाणार आहे.त्याचवेळी दहा पालिकांचे नवे कारभारी कोण असतील हे स्पष्ट होणार आहे.दरम्यान,जिल्ह्यातील दहा पालिकांच्या हद्दीत कडक पोलीस बंदोबस्तात स्ट्राँगरुमध्ये या ईव्हीएस सुरक्षितठेवण्यात आल्या आहेत.तेथे सीसीटीव्हींसह पोलिसांचा जागता पहारा 24 तास सुरु करण्यात आला आहे.
आगामी नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत आयोजनासाठी जिल्हा प्रशासनाने स्ट्राँग रूमची अंतिम यादी जाहीर केली आहे. प्रत्येक नगरपरिषद क्षेत्रासाठी मतदानोत्तर मशिन्स ठेवण्यासाठी स्वतंत्र आणि उच्च सुरक्षा असलेली ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. निवडणुकांदरम्यान आणि मतमोजणीपर्यंत या स्ट्राँग रूममध्ये कडक बंदोबस्त, देखरेख आणि तीन स्तरांचा सुरक्षा व्यवस्था असेल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
खोपोली नगरपरिषदेसाठी स्ट्राँग रूम सेंट मेरीज हायस्कूल, चिंचवली डीपी रोड येथे तर अलिबाग नगरपरिषदेचे स्ट्राँग रूम केईएस जनरल अरुणकुमार वैद्य हायस्कूल, अलिबाग येथे निश्चित करण्यात आले आहे. पेणसाठी लिटल एंजल्स स्कूल, उरणसाठी उरण नगर परिषद कार्यालय, मुरुडसाठी तहसील कार्यालय, मुरुड, तर रोह्यासाठी जेष्ठ नागरिक सभामंडप, रोहा येथे स्ट्राँग रूम असणार आहे.
कर्जतला नगर परिषद कार्यालयात, माथेरानला उप कोषागार कार्यालय, श्रीवर्धनसाठीची स्ट्राँग रूम तहसील कार्यालल येथेे निश्चित करण्यात आली आहे. महाड नगरपरिषदेची यंत्रणा महाड नगर परिषद कार्यालयात सुरक्षित ठेवली आहेत.जिल्हा प्रशासनाने सर्व स्ट्राँग रूम ठिकाणी नियमांनुसार सर्व सुविधा आणि आवश्यक सुरक्षा उपाय तातडीने कार्यान्वित करण्याचे आदेश संबंधित विभागांना दिले आहेत.
पेणच्या मतपेट्यांचा भार 17 पोलिसांसह 12 कॅमेऱ्यांवर
पेणः पेण नगरपरिषदेच्या निवडणुकीनंतर मतपेट्या आता 21 डिसेंबर रोजी उघडणार असल्याने त्या मतपेट्या आता सुरक्षित सांभाळणे फार अवघड काम आहे. एक वेळ स्वतःच्या मुलांना सांभाळाने सोपे पण मतपेट्या संभालणे फार अवघड असणारे काम आता राज्याच्या पोलीस यंत्रणावर आले आहे. आणि पोलीस यंत्रणने सिसिटीव्ही केमेऱ्यावर हा अर्धा भार टाकला आहे.
पेण नगरपरिषदेच्या 41केंद्रावर झालेले मतदान आता एकूण 41मतदान यंत्र आणि राखीव 24 मतदान यंत्र असे एकूण 65 मशीन व 71 बॅलेट युनिट बॅटरी सह पेण शहरातील को.ए.सो. च्या पेण येथील लिटिल एंजल्स स्कुलच्या एका मोठ्या खोलीत बंद करून ठेवण्यात आली आहेत. आणि ह्या मतपेट्या सांभाळण्याची जबाबदारी सह्यायक पोलीस निरीक्षक अशोक भास्कर आधागले व जोडीला 8 पोलीस अंमलदार, व राज्य राखीव पोलीस दलाचे 8 जवान अशा 17 पोलीस जवानावर असून त्यांचा अर्धा भार 12 सिसिटीव्ही कॅमेऱ्यांवर आला आहे. यातील 3 केमेरे मतदान यंत्र असणाऱ्या खोलीत तर 9 केमेरे खोलीच्या चारही बाजूला असून हे केमेरे सुरु असलेली स्क्रीनटीव्ही वर पोलीस नजर ठेवून आहेत. हा सशस्त्र चोवीस तास पहारा सुरु राहणार आहे.
कॅमेऱ्यांचे चित्रीकरण देण्याची मागणी
13 नोव्हेंबर रोजी मतदान यंत्र पेनच्या ज्या शाळेत आणण्यात आलेत त्या तारखेपासून म्हणजे 13 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर मतमोजणी होईपर्यंतचे सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण ची मागणी स्वतः उमेदवार नंदा मात्रे यांनी मागितली आहेत तशी त्यांना देण्याची व्यवस्था प्रशासनाने केली आहे. एकूणच पेण नगरपालिकेच्या मतपेटी यांची व्यवस्था सुरक्षा व्यवस्था चा भार सतरा पोलीस कर्मचाऱ्यांच्या वर आणि 12 सीसीटीव्ही कॅमेरा वर आलेला आहे 21 डिसेंबर हा तसा पाहता खूप लांबचा अंतर असल्यामुळे पोलिसांना मात्र 24 तास डोळ्यात तेल टाकून पहारा द्यावा लागेल.