

महाड, पुढारी वृत्तसेवा : महाड एमआयडीसी पोलिसांनी तपास पथक तयार करून मौजे पिंपळदरी मोरांडे वाडी येथे चंद्रकांत शिंदे यांच्या घरात छापा टाकला. यावेळी अवैधरीत्या वास्तव्यास असलेले ६ बांगलादेशी नागरिक मिळून आले. पाच पुरुष व एक महिलेस ताब्यात घेण्यात आले आहे. (Raigad Crime News)
पोलिसांच्या चौकशीत बांगलादेशी नागरिकांना पी.डी.आय.पी.एल या बांधकाम कंपनीने कामावर ठेवल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्याकडे बांगलादेशातून भारतात येण्यासाठी लागणारी वैध प्रवासी कागदपत्राची मागणी केली. तर त्यांनी आमच्या कडे कोणतेही वैध कागदपत्रे नाहीत. आम्ही बांगलादेशातील गरिबी व उपासमारीस कंटाळून रोजगारासाठी सीमेवरील गस्ती पथकाची नजर चुकवून भारतात प्रवेश केल्याची माहिती दिली. महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महाड एमआयडीसी पोलीस करीत आहेत.
1) माणिक तुफेझेल विशष (वय 32, व्यवसाय - सेंट्रिंग काम, सध्या रा. पिंपळदरी, मूळ रा. सुबोधपुर, बडतळा बाजार, पो. ठाणे दश्शोना, जि. चौंडगा, जोषारे खुलना, बांगलादेश)
2) नूर इस्माल बिस वास उर्फ सिकंदर रोने मानेरूलखान (वय 30, सध्या रा. वरंध ता.महाड, मूळ रा. बासग्रॅम, पोलीस ठाणे कालिया, विभाग खुलना, जि.नोडाई, बांगलादेश)
3) सागर मिराज शेख (वय 30, रा. पिंपळदरी ता. महाड जि. रायगड, मूळ रा.उत्तर
शिंगे, पोलीस ठाणा नोडल, जि.नोडल विभाग खुलना, बांगलादेश)
4) शांतु शकुरअली शेख (वय19, सध्या रा. पिंपळदरी, ता. महाड, जि. रायगड,
मूळ रा.पुरुलिया, पोलीस ठाणा कालिया, जि. नाडाई विभाग खुलना,
बांगलादेश)
5) शिलीम हामशेर परामणी (वय 40, सध्या राहणार पिंपळदरी तालुका महाड
जिल्हा रायगड, मूळ रा अब्दुलपुर ठाणा-लालपुर जिल्हा नाटोर विभाग रासई,
बांगलादेश)