Raigad News : सततच्या पावसाने भातपीकाला धोका

कर्जत तालुक्यातील बळीराजा हवालदिल
rice crop damage
सततच्या पावसाने भातपीकाला धोकाpudhari photo
Published on
Updated on

कर्जत ः तालुक्यात भाताच्या पिके घेणार्‍या शेतकर्‍यांना यावर्षी पावसाने सतत झोडपले आहे. मे महिन्याचे पहिल्या आठवड्यात सुरू झालेला पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. आता तर शेतात उभी असलेली पिके वादळी वा़र्‍या सह सुरू असलेल्या पावसामुळे जमिनीवर कोसळली असून नष्ट होताना दिसत आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून कोसळणार्या सततधार पावसाने शेतकर्‍यांची वाट लावली आहे. कापणीस आलेली भातशेती अक्षरशः भुईसपाट झाली असून शेतकर्‍यांचा हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. मेहनतीची वर्षभराची पिके क्षणात पाण्याखाली गेल्याने तालुक्यात हताशा आणि वेदनेचे वातावरण पसरले आहे. तालुक्यातील वारे, कळंब, गरूडपाडा, पोशिर, जामरुख, टेम्भेरे, खांडस, वेणगाव, बारणे गौरकामथ अशा बहुतांश भागात भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.

rice crop damage
Raigad Crime News: महाडमध्ये 10 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार

कापणीसाठी सज्ज झालेली भातशेती चिखलात कोसळली असून शेतांच्या बांधांना भगदाड पडल्याने माती वाहून गेली आहे. सध्या शेतकरी डोळ्यादेखत आपली शेती उद्ध्वस्त होताना बघत आहेत; पण काहीही करता येत नाही, अशी असहाय्य परिस्थिती आहे. वाढती मजुरी, महाग झालेली बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके या खर्चाचा डोंगर उचलून शेतकर्यांनी कसेबसे पिक उभे केले होते; पण नैसर्गिक आपत्तीने त्यांच्या स्वप्नांची राख केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news