Raigad Revenue Employees Protest: लेखणीबंद आंदोलनामुळे रायगडात महसूलचे कामकाज ठप्प

चरी मंडळ अधिका-याच्या अटकेची चाैकशी करा : कर्मचाऱ्यांची मागणी; जिल्ह्यात ठिकठिकाणी निदर्शने
Raigad Revenue Employees Protest
Raigad Revenue Employees ProtestPudhari
Published on
Updated on

रमेश कांबळे

अलिबाग: अलिबाग तालुक्यातील चरी मंडळ अधिकारी यांना पोयनाड पोलिसांनी केलेल्या अटकेविरोधात रायगड जिल्ह्यातील महसूल अधिकारी व कर्मचारी आक्रमक झाले आहेत. अटकेची कारवाई बेकायदा असल्याचा आरोप करीत महसूल कर्मचारी संघटनेने सोमवारी (२७ जुलै) लेखणी बंद आंदोलन केले. या लेखणीबंद आंदोलनामुळे तलाठी, तहसीलदार ते जिल्ह्याधिकारी कार्यालयातील कामकाजावर परिणाम झाला. जिल्ह्यातील ठिकठिकाणी निदर्शने झाली.

शहापूर औद्योगिक क्षेत्रासाठी पोहोच रस्त्याच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर महसूल विभागातील संबंधित अधिकारी आणि कर्मचा-यांनी फेरफार नोंदींमधून शाह यांचे नाव वगळले किंवा रद्द केले. परिणामी, वास्तविक खरेदीदाराचा अधिकार नाकारत मूळ खातेदारांच्या नावावर भूसंपादनाचा मोबदला मंजूर करण्यात आला आहे.

Raigad Revenue Employees Protest
BEST Redevelopment Dues: थकबाकीदार विकासकांना बेस्टची पुनर्वसनाची कामे! विकासकांनी बेस्टचे ३२७० कोटी थकवले

याच प्रक्रियेत ४३ लाख १५ हजार ३८ रुपयांचा मोबदला मूळ खातेदार आणि मृत व्यक्तीच्या नावावर वितरित करण्यात आल्याचा आरोप शहा यांनी तक्रारीत केला आहे. तसेच, मृत सुमन पाटील यांचे नाव सातबारा उता-यावर कायम ठेवणे, फेरफार नोंदींमध्ये दिशाभूल करणारे बदल करणे आणि सरकारी अभिलेखांमध्ये छेडछाड करून शासनासह तक्रारदाराची आर्थिक फसवणूक केल्याचाही आरोप केला आहे.

शहा यांच्या तक्रारीवरुन पोयनाड पोलिस ठाण्यात चरी मंडळ अधिकारी रविदास सदुसिंग जाधव, तलाठी सतिश भानुदास दवले, मूळ जमीनधारक रितेश किसन पाटील, रिना किसन पाटील उर्फ रिना साईराज येलमकर आणि व्यवहारातील मध्यस्थ कुमार नारायण बैकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Raigad Revenue Employees Protest
Mumbai BMC Committee Meetings: मुंबई महापालिकेत एकाच दिवशी तीन समित्यांच्या सभा; प्रशासनासह नगरसेवकांची दमछाक

याप्रकरणी पोपनाड पोलिसांनी मंडळ अधिकारी जाधव यांना अटक केली आहे. मात्र, मंडळ अधिका-यांवरील अटकेची कारवाई कायदेशीर प्रक्रियेचे पालन न करता करण्यात आल्याचा आरोप महसूल अधिकारी व कर्मचा-यांनी केला आहे. या प्रकरणात न्याय मिळावा, अटकेची कारवाई मागे घ्यावी आणि संबंधित अधिका-यांवरील कारवाईचा फेरविचार करावा, या मागण्यांसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलन झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news