Raigad Rain Update | रायगडला यलो अलर्ट तरी पाऊस कमीच

अपुर्‍या पावसामुळे अनेक समस्या
Raigad Rain Update
रायगडला यलो अलर्ट तरी पाऊस कमीच File Photo

रायगड : हवामान विभागाने रायगड जिल्हयासाठी पावसाचा यलो अलर्ट जाहीर केलेला असला तरी गेली तीन-चार दिवसांपासून पावसाचा जोर कमीच दिसून येत आहे.

गेल्या चोवीस तासात सर्वाधिक पाऊस सुधागड तालुक्यात (33 मि.मी.) झाला आहे. जुलै महिन्याचा पहिल्या आठवड्याचे चार दिवस झाले तरी पावसाचा जोर वाढलेला नाही. पुरेसे पिण्याचे पाणी, शेतीसाठी पाणी आणि अद्यापही वातावरणात उष्मा असणे या समस्या अपुर्‍या पावसामुळे सध्या भेडसावत आहेत. गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासात जिल्हयातील अलिबाग तालुक्यात 2 मि.मी., पेण 20 मि.मी. मुरुड 4, पनवेल 5, उरण 2, कर्जत 4, खालापूर 6, माणगाव 2, रोहा 8, सुधागड 33, तळा 10, महाड 7, पोलादपूर 8, म्हसळा 7, श्रीवर्धन 2, माथेरान 17.8 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news