Raigad Rain Update | जूनमध्ये वरुणराजाला सरासरी गाठता आलीच नाही

धरणे, शेतीसाठी मोठ्या पर्जन्याची प्रतीक्षा
Rain in the Raigad
जूनमध्ये वरुणराजाला सरासरी गाठता आलीच नाहीFile Photo

रायगड जिल्ह्यात या वर्षी पावसाने जून महिन्याची अद्याप सरासरी गाठलेली नाही. मात्र मागील वर्षापेक्षा या वर्षी पावसाची स्थिती समाधानकारक दिसत आहे. गेल्या वर्षी ३० जूनपर्यंत सत्तर टक्के तर यावर्षी जवळजवळ ७७ टक्के पाऊस झाला आहे. जून महिन्यात ६५५ मि.मी. पाऊस पडतो तर यावर्षी ५०२ मि.मी. पाऊस झाला आहे. आतापर्यंत जिल्हयात सर्वाधिक पाऊस तळा तालुक्यात झाला आहे. गेल्या चोवीस तासात म्हसळा तालुक्यात पावसाची सर्वाधिक नोंद झाली असून सोमवारसाठी पावसाचा ऑरेंज तर पुढे ४ जुलैपर्यंत यलो अलर्ट आहे.

या वर्षी मान्सूनच्या पावसाने जूनच्या पहिल्या आठवड्यापासून हळूहळू सुरुवात केल्यानंतर पुढील काळात पावसाचा जोर वाढला आहे. हवामान विभागाने गेल्या १५ ते २० दिवसांच्या काळात अतिवष्टीचा इशाराही दिला. त्याप्रमाणे जिल्हयाच्या काही भागात मुसळधार पावस झाला आहे. आता ३० जूनपर्यंत पावसाची वाटचाल काहीशी मंदावल्याचे दिसत आहे. रविवारी जिल्हयात काही भागात पावसाच्या मध्यम स्वरुपाच्या सरी झाल्या. मात्र जोरदार पाऊस झालेला नाही. रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासात अलिबाग तालुक्यात १२.७ मि.मी., पेण २१.४, मुरुड २३.९, पनवेल २६.२, उरण १८.१, कर्जत २०.२, खालापूर १५.३, माणगाव २१.५, रोहा ३७.९, सुधागड २४.७, तळा ३४.१, महाड २९.९, पोलादपूर ३१.४, म्हसळा ३९.५, श्रीवर्धन ३०.३ मि.मी. अशी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस म्हसळा तर सर्वात कमी पाऊस अलिबाग तालुक्यात झाला आहे. गेल्या महिनाभरात रायगड जिल्हयात संमिश्र पाऊस झाला आहे. ३० जूनच्या सकाळपर्यंत पावसाने जून महिन्यातील पावसाची सरासरी गाठली नव्हती. जिल्हयातील अलिबाग तालुक्यात ९२.८ टक्के, पेण ८३.७, मुरुड ९६.२, पनवेल ८६.९, उरण ५५.५, कर्जत ४६.९, खालापूर ५२.१, माणगाव ९२.२, रोहा ८१.९, सुधागड ७०.९, तळा ९८.८, महाड ९३.२, पोलादपूर ६५.२, म्हसळा ८७.८, श्रीवर्धन ७६.१ टक्के अशी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सहा टक्क्‌याने पाऊस जास्त आहे. गेल्या वर्षी ७० टक्के तर यावर्षी ७६ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे याही वर्षी सरासरीच्या तुलनेत पाऊस कमीच आहे.

या तालुक्यांना कमीच पाऊस

अलिबाग, सुधागड, महाड, माणगाव, रोहा, मुरुड, श्रीवर्धन, म्हसळा आणि तळा या नऊ तालुक्यात गेल्या वर्षी पेक्षा जास्त मात्र जून महिन्याच्या सरासरी पेक्षा कमी पाऊस आहे. तर पनवेल तालुक्यात गेल्यावर्षी इतकाच पाऊस झाला आहे. कर्जत, खालापूर, पेण आणि उरण तालुक्यात गेल्या वर्षीपेक्षा आणि सरासरी पेक्षा पाऊस कमी झाला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news