Raigad News : पोटाची खळगी भरण्यासाठी आली भटकंतीची वेळ; नागपूर स्टेशनवर आढळला उत्तर प्रदेशचा 'आसिफ'

रेल्वे कर्मचारी आणि चाइल्ड हेल्पलाईनच्या मदतीने पालकांचा शोध सुरू
Raigad News
Raigad News
Published on
Updated on

रोहे : घरची परिस्थिती हलाखीची असल्याने नोकरीच्या शोधात उत्तर प्रदेशातून नागपुरात आला होता. काम न मिळाल्याने प्लॅटफॉर्मवर भरकटत तो फिरत असताना रेल्वे तिकीट परीक्षकाच्या निदर्शनास आला. सध्या या मुलाला रेल्वे प्रशासनाने सुरक्षित ठिकाणी ठेवले असून, त्याच्या पालकांशी संपर्क साधण्यात आला आहे. लवकरच हा मुलगा आपल्या पालकांच्या स्वाधीन केला जाईल.

नागपूर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर कर्तव्य बजावत असताना शनिवारी (दि.६) मुख्य तिकीट परीक्षक (हेड टीई) श्री प्रवीण लोंडसे यांना एक किशोरवयीन मुलगा संशयास्पदरित्या फिरताना आढळला. चौकशी केली असता त्याने आपले नाव मोहम्मद आसिफ, वडिलांचे नाव मोहम्मद याकूब असून तो उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्याचा रहिवासी असल्याचे सांगितले.

मुलाने रेल्वे कर्मचाऱ्यांना सांगितले की, तो मागील दोन महिन्यांपासून कामाच्या शोधात नागपुरात राहत होता आणि त्याची काळजी घेणारे घरी कोणीही नाही. त्याची परिस्थिती लक्षात घेऊन रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्याला तात्काळ खाण्यापिण्यासह आवश्यक मदत उपलब्ध करून दिली. मुलाकडे त्याच्या कुटुंबीयांचे संपर्क क्रमांक उपलब्ध असल्याने त्याची कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आला. तसेच रेल्वे कर्मचाऱ्यांनीही त्याच्या नातेवाईकांशी चर्चा करून त्यांना नागपुरात येऊन मुलाला ताब्यात घेण्याची विनंती केली.

नियमानुसार पुढील कार्यवाहीसाठी मुलाला चाइल्ड हेल्पलाईनच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती देऊन नागपुरात बोलाविण्यात आले आहे. सर्व आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मुलाला कुटुंबीयांकडे सोपविण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news