

कोलाड : छुप्या मार्गाने काळ्या बाजारात रेशनींग विक्री करणाऱ्या रेशनींग धारकांवर कोलाड पोलिसांनी धडक कारवाई करून पाच जणांना रंगेहात पकडले आहे. त्यांच्याकडून ५ लाख ४१ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि कोलाड पोलीस ठाण्याचे पोहवा मारुती देव्हारे तसेच पोशि पांचाळ हे रविवार ५ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ८.१५ वाजता पेट्रोलिंग करिता गारभट व खरबाचीवाडी येथे सरकारी वाहन.एम. एच.०६ सीडी ४८९९ हिने पेट्रोलिंग करता स्टेशन डायरीला नोंद करून गेले असता खरबाचीवाडी येथे पेट्रोलिंग करून येथून परत येत असताना गारभट बाजूकडून एक सफेद रंगाची पिकअप गाडी प्लास्टिकच्या कपड्याने पॅक करून येताना दिसली.
त्या गाडीला पोहवा मारुती देव्हारे यांनी हात करून थांबावली व गाडीत काही आहे असे सांगितले असता वाहन चालक यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. गाडी चेक केली असता त्या गाडीत रेशनिंग दुकानातील गहू तांदळाच्या ४१ गोणी दिसून आल्या. या गोणी गारभट येथील रेशनिंग दुकानदार शरद उर्फ नाना शिंदे यांच्या कडून भरून ललित शेठ फुलचंद ओसवाल पाली सुधागड येथे नेत असल्याचे वाहन चालक दिपक भागोजी दंत यांनी सांगितले. सदरची माहिती कोलाड पोलीस ठाण्याचे सपोनि नितीन मोहिते यांना दिली असता ही गाडी कोलाड पोलीस ठाण्यात घेऊन या असे सांगण्यात आले. पिकअप गाडी क्र. एम. एच.०६ बी. डब्ल्यू. ६२८६ यामध्ये असलेला रेशनिंग गहू व तांदळाचे एकूण ४१ गोणीचा पंचनामा करण्याकरता पोलीस उपनिरीक्षक भोजकर यांनी कोलाड पोलीस ठाण्यात बोलावून घेतले.
पिकअप मध्ये ५० किलोच्या २५ गोणी अंदाजे एका किलोला २० रुपये प्रमाणे १२५० किलो वजनाचे २५००० रुपये तसेच गव्हाच्या ५० किलो वाजनाच्या १६ गोणी एका किलोची किंमत २० रुपये एकूण ८०० किलोचे १६००० रुपये असे महाराष्ट्र शासनाचा लोगो असलेले ४१ हजार रुपयांचा माल तसेच ५ लाख रुपयांची गाडी असे एकूण ५ लाख ४१ हजार रुपयांचा माल करण्यात आला आहे.
यातील आरोपी दिपक भागोजी दंत रा. वावळोली, पो. सिद्धेश्वर, ता. सुधागड, शरद उर्फ नाना शंकर शिंदे रा. चिंचवली तर्फे अतोणे खालचा गारभट, ता. रोहा, ललितशेठ फुलचंद ओसवाल रा. पाली, हनुमंत शिंदे, तसेच रुपेश यांनी एकमेकांशी संगनमत करून रेशनिंग दुकानातील धान्य तांदूळ व गहू हे शासनाकडून जनतेला वाटप करण्यासाठी दिले होते परंतु ते जन-तेला वाटप न करता दुसऱ्या आर-जप्त ोपीने स्वतःच्या फायद्यासाठी पिकअपमध्ये भरून गैरफायदा वाहतूक करीत असल्याचे मिळून आला असल्याची नोंद कोलाड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याचा अधिक तपास सपोनि नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शखाली पोसई भोजकर करित आहेत.