पनवेल : शेतकरी कामगार पक्ष हा तळागाळातील बहुजन समाजाचा पक्ष असून पनवेल उरण तालुक्यात कितीही शेठ गेले तरी सर्व सामान्य जनता शेकापबरोबर असल्याचा प्रत्यय आज याठिकाणी आला आहे. सर्व कार्यकर्त्यांनी सज्ज राहून आगामी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती व महानगरपालिका निवडणूकीसाठी तीन महिने अहोरात्र प्रयत्न करुन पुन्हा एकदा शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा फडकवण्याची जबाबदारी कार्यकत्यांसंह नवनियुक्त 550 पदाधिका-यांनी घेतली पाहिजे असे प्रतिपादन शेकापचे नेते माजी आ. बाळाराम पाटील यांनी आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित केलेल्या पदाधिकारी पद नियुक्ती व रिल्स स्पर्धेचे बक्षिस वितरण कार्यक्रमात व्यक्त केले.
प्रारंभी पनवेल शहर चिटणीस प्रकाश म्हात्रे यांनी महानगर पालिकेच्या अनागोंदी कारभाराबाबत टीका करुन शेकापक्ष सामान्य माणसाच्या हितासाठी लढत असून नायब तहसिलदार व महानगरपालिकेवर मोर्चा नेहून अन्यायाविरुध्द आवाज उठविला. यावेळी जिल्हा शेकाप चिटणीस सुरेश खैरे, पनवेल विधानसभा शेकाप अध्यक्ष काशिनाथ पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायणशेठ घरत, तालुका शेकाप चिटणीस राजेश केणी यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला.
550 पदाधिका-यांना नियुक्त पत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. तसेच पनवेलच्या विकास कामांची पोलखोल करणा-या 75 रिल्सस्टार पैकी तिघांना रोख बक्षिस व सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले. सुनिल भारतीय यांनी याचे सुंदर नियोजन केले होते.
पडघेचे माजी सरपंच अशोक त्रिबंक भोईर, योगेश त्रिबंक भोईर यांच्या नेतृत्वाखाली असंख्य कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी व्यासपिठावर डॉ. दत्तात्रेय पाटील, माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे, आदी उपस्थित होत्या.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाटील यांनी गटविकास अधिकारी यांच्या भ्रष्टाचारी कारभाराची पोलखोल करताना चिखले सरपंच सचिन तांडेल यांच्यावर केलेली अकसाने कारवाई व 20 कोटी मुद्रांकशुल्का साठी मागणी याचा उहापोह केला.