Raigad Police | कोकण परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात रायगड पोलिस दलाचा दबदबा

रायगड येथे १३ ते १५ जुलैदरम्यान झालेल्या या २१ व्या कर्तव्य मेळाव्यात रायगडने तब्बल २२ पदकांची कमाई
Konkan Range Police  Kartavya Melava
Konkan Range Police Kartavya MelavaPudhari
Published on
Updated on

Konkan Range Police Kartavya Melava

रायगड : कोकण परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळावा-२०२६ मध्ये रायगड जिल्हा पोलीस दलाने उत्कृष्ट कामगिरी करत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. रायगड येथे १३ ते १५ जुलैदरम्यान झालेल्या या २१ व्या कर्तव्य मेळाव्यात रायगडने तब्बल २२ पदकांची कमाई करत प्रथम क्रमांक मिळवला.

रायगड पोलीस दलाच्या यजमानपदाखाली आयोजित या मेळाव्यात कोकण परिक्षेत्रातील पाच घटकांतील २१ पोलीस अधिकारी, ८८ पोलीस अंमलदार आणि श्वान पथकांनी सहभाग घेतला. व्यावसायिक कौशल्य, तांत्रिक ज्ञान आणि तपासातील प्रावीण्याची कसोटी पाहणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये सहभागी स्पर्धकांनी उल्लेखनीय कामगिरी केली.

Konkan Range Police  Kartavya Melava
Raigad News : पुराच्या पाण्यामुळे गॅरेजेस झाली हाऊसफुल

मेळाव्यात गुन्ह्यांच्या वैज्ञानिक तपासातील साहाय्य, घातपातविरोधी तपासणी, पोलीस फोटोग्राफी, पोलीस व्हिडिओग्राफी, संगणक साक्षरता आणि श्वान पथक अशा सहा प्रमुख विषयांवर लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आल्या. या विषयांतील २० उपप्रकारांमध्ये स्पर्धा पार पडल्या. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांना एकूण २० सुवर्ण, २० रजत आणि १९ कांस्य पदकांनी गौरविण्यात आले.

अंतिम पदकतालिकेत रायगड जिल्ह्याने ९ सुवर्ण, ६ रजत आणि ७ कांस्य अशी एकूण २२ पदके मिळवून सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. रत्नागिरी जिल्ह्याने २ सुवर्ण, ५ रजत आणि ७ कांस्य अशा एकूण १४ पदकांसह उपविजेतेपद मिळविले. पालघर जिल्ह्याने ३ सुवर्ण, ३ रजत आणि ३ कांस्य अशा नऊ पदकांसह तृतीय स्थान पटकावले. सिंधुदुर्ग जिल्हा आठ पदकांसह चौथ्या, तर ठाणे ग्रामीण जिल्हा सहा पदकांसह पाचव्या स्थानावर राहिला.

Konkan Range Police  Kartavya Melava
Raigad tourism : कर्जतमधील पर्यटनस्थळांकडे पर्यटकांचा वाढता ओढा !

स्पर्धेच्या सांगता समारंभात कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या हस्ते विजेत्यांना पदके, प्रशस्तीपत्रे आणि सर्वसाधारण विजेत्या रायगड पोलीस दलाला विजेतेपदाची ट्रॉफी प्रदान करण्यात आली. स्पर्धा यशस्वी आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडणाऱ्या परीक्षकांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.

रायगड पोलीस दलाच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीणा आणि रायगडच्या पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी सर्व विजेते आणि सहभागी पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. राज्य व राष्ट्रीय स्तरावरील पोलीस कर्तव्य मेळाव्यांमध्येही कोकण परिक्षेत्राने अशीच उल्लेखनीय कामगिरी करावी, अशा शुभेच्छाही त्यांनी यावेळी दिल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news