Raigad Police | रायगड पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा: 'एनएसजी'च्या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणात रेश्मा डफळ यांचे उल्लेखनीय यश

४६ देशांतील अधिकाऱ्यांमध्ये भारतातून सहभागी एकमेव महिला पोलीस अधिकारी
Reshma Dafal NSG International Training Success
रायगड पोलीस दलातील महिला अधिकारी रेश्मा सुदाम डफळ यांना मेडल प्रदान करुन अभिनंदन करताना रायगड जिल्हा पाेलिस अधिक्षक श्रीमती आंचल दलालPudhari
Published on
Updated on

Reshma Dafal NSG International Training Success

रायगड : हरियाणा राज्यातील मानेसर येथे नॅशनल सिक्युरिटी गार्ड (एनएसजी) आयोजित ४५ दिवसांच्या आंतरराष्ट्रीय संरक्षण व सुरक्षा विषयक अत्यंत खडतर प्रशिक्षणामध्ये रायगड पोलीस दलातील महिला अधिकारी रेश्मा सुदाम डफळ यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल रायगडच्या पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रमात जगातील ४६ देशांतील पोलीस व संरक्षण विभागातील अधिकारी सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, भारतातून सहभागी झालेल्या रेश्मा डफळ या एकमेव महिला पोलीस अधिकारी ठरल्या. त्यांनी प्रशिक्षणादरम्यान उत्कृष्ट कामगिरी करत ‘ए-१ ग्रेडिंग’मध्ये पाचवा क्रमांक पटकावला. त्यांच्या या यशामुळे रायगड पोलीस दलासह महाराष्ट्राची मान उंचावली आहे.

Reshma Dafal NSG International Training Success
Raigad news | रायगडावर भाविकांच्या गोपनीयतेचा भंग; नैसर्गिक विधीचे ड्रोनने चित्रीकरण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

रेश्मा डफळ या रायगड पोलीस दलाच्या बॉम्बशोधक व नाशक पथकात (बीडीडीएस) कार्यरत आहेत. मानेसर येथील एनएसजी अकादमीत झालेला हा प्रशिक्षण कार्यक्रम शारीरिक व मानसिक क्षमतेची कसोटी पाहणारा मानला जातो. या प्रशिक्षणातून तयार होणारे अधिकारी देशाच्या सुरक्षा व्यवस्थेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात.

कुस्ती क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी

रेश्मा डफळ या आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित महिला कुस्तीपटूदेखील आहेत. गेल्या १५ वर्षांत त्यांनी ४५ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले असून अनेक सुवर्णपदके जिंकली आहेत. क्रीडा क्षेत्रातील त्यांची जिद्द, शिस्त आणि शारीरिक क्षमता एनएसजीच्या कठोर प्रशिक्षणातही उपयोगी ठरली.

Reshma Dafal NSG International Training Success
Raigad MSRTC News | एका फेरीत १ लाख १ हजार ४६२ रुपयांचे उत्पन्न; अलिबाग-शेगाव बसच्या चालक-वाहकांचा सत्कार

४६ देशांतील अधिकाऱ्यांना भारतात प्रशिक्षण

एनएसजीतर्फे मानेसर येथे दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या या प्रशिक्षणात मित्र राष्ट्रांतील लष्करी आणि पोलीस अधिकारी सहभागी होतात. काउंटर टेररिझम, बॉम्ब डिस्पोजल, होस्टेज रेस्क्यू, प्रगत शस्त्रास्त्र हाताळणी, मानसिक ताण-तणाव व्यवस्थापन आणि आपत्कालीन परिस्थितीत जलद निर्णयक्षमता विकसित करण्यावर या प्रशिक्षणात विशेष भर दिला जातो.

अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उच्च दर्जाच्या सुरक्षा कौशल्यांवर आधारित हे प्रशिक्षण जागतिक स्तरावर प्रतिष्ठित मानले जाते. अशा प्रशिक्षणात उल्लेखनीय यश मिळवून रेश्मा डफळ यांनी रायगड पोलीस दलाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news