Raigad Police Recruitment | रायगड पोलीस भरतीची आज लेखी परीक्षा

अलिबाग-पेण तालुक्यातील ११ केंद्रांवर होणार परीक्षा; ४७४७ उमेदवार
police written exam
रायगड पोलीस भरतीची आज लेखी परीक्षाPudhari File Photo
Published on
Updated on

रायगड : रायगड जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवरील सर्वसाधारण पोलीस शिपाई ३९१ पदांकरीता होणारी लेखी परीक्षा शनिवारी (१० ऑगस्ट) अलिबाग आणि पेण क्यातील ११ केंद्रांवर होत आहे. मैदानी चाचणीत पात्र ठरलेले पुरूष ३५७२ व महिला ११७५ असे एकुण ४७४७ असे उमेदवार ही परीक्षा देणार आहेत.

रायगड जिल्ह्याची पोलीस भरती प्रक्रिया २१ जूनपासून सुरू झाली आहे.

३८२ पोलीस कॉन्स्टेबल, ९ बँड्समन व ३१ चालक कॉन्स्टेबल अशा एकूण ४२२ पदांसाठी जिल्हा पोलीस दलात ही भरती आहे. नुकतीच मैदानी चाचणी पार पडली आहे. यातील पात्र उमेदवारांची शिपाई पदाची लेखी परीक्षा शनिवारी, १० ऑगस्ट रोजी होत आहे. अलिबाग पोलीस ठाणे हद्दीमधील जे.एस.एम. कॉलेज, अॅड. दत्ता पाटील कॉलेज ऑफ लॉ, के.ई.एस. जनरल अरुणकुमार वैद्य, माध्यमिक विद्यालय, के. ई. एस. श्रीमती जा. र. ह. कन्याशाळा, सेंटमेरी हायस्कूल, श्री. चिंतामणराव केळकर, विद्यालय, पीएनपी कॉलेज, वेश्वी या सात परीक्षा केंद्रामध्ये एकुण पुरूष १९४० व महिला ११७५ तसेच पेण पोलीस ठाणे हद्दीतील प्रायव्हेट हायस्कूल ज्युनिअर कॉलेज, सौ. एम.एन. नेने कन्या विद्यालय, डॉ. पतंगराव कदम आर्ट अॅन्ड कॉमर्स कॉलेज, सार्वजनिक विद्यामंदिर अॅन्ड ज्युनिअर या चार परीक्षा केंद्रांवर एकुण पुरूष १६३२ आदींची घेण्यात येणार आहे. या लेखी परीक्षेकरीता एकुण पुरूष ३५७२ व एकुण महिला उमेदवार ११७५ असे एकुण ४७४७ असे उमेदवार उपस्थित असणार आहेत. ही लेखी परीक्षा निर्भयपणे, शांततामय वातावरणार पार पडाव्यात यादृष्टीने सर्वतोपरी उपाययोजना रायगड पोलीस विभागाकडून करण्यात आल्या आहेत. परीक्षा कालावधीत तोतयागिरी, कॉपी करणे, इलेक्ट्रोनिक साहित्याचा गैरवापर करणे असे प्रकार करणा-या इसमांवर काटेकोरपणे कारवाईसाठी पोलीस विभागाकडून लक्ष ठेवले जाणार आहे.

police written exam
Actor Vijay Kadam Death : मराठी चित्रपटसृष्टीला आणखी एक धक्का; अभिनेते विजय कदम यांचे निधन

बंदोबस्ताकरिता ६७७ कर्मचारी

परीक्षा शांततेत व निर्भयपणे वातावरणात पारदर्शक पध्दतीने पार पाडण्यासाठी परिक्षा केंद्रावर व केंद्रा बाहेरील परिसरात १ पोलीस अधीक्षक, १ अपर पोलीस अधीक्षक, १०० पोलीस अधिकारी, ५७६ अंमलदार असे एकुण ६७७ पोलीस अधिकारी व अंमलदार बंदोबस्ताकरीता नेमण्यात आले आहेत, अशी माहिती रायगड पोलीस विभागाकडून देण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news