Poladpur Accident | पोलादपूर येथे उभ्या आयशर टेम्पोला मागून धडक; एकाचा जागीच मृत्यू, चालक जखमी

काळभैरव रेस्क्यू टीमची तातडीने मदत
Poladpur Eicher Tempo Crash
Poladpur Eicher Tempo CrashPudhari
Published on
Updated on

Poladpur Eicher Tempo Crash

पोलादपूर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर पोलादपूर ग्रामीण रुग्णालयासमोर बुधवारी (दि.९) पहाटे भीषण अपघात झाला. महामार्गावर धोकादायक पद्धतीने उभ्या केलेल्या आयशर टेम्पोला मागून टेम्पोने जोरदार धडक दिली. या अपघातात टेम्पोमधील दीपक शिवाजी वायदंडे (वय ४७) यांचा जागीच मृत्यू झाला, तर चालक मल्लिकार्जुन वासुदेव ढवण (वय ४९, रा. विटा, खानापूर, जि. सांगली) हे किरकोळ जखमी झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, ९ सप्टेंबर रोजी पहाटे चारच्या सुमारास हा अपघात झाला. बलीराम बंद्रीलाल सोलंकी (वय ४६, रा. बजरंग मोहल्ला, ता. पीथमपूर, जि. धार, मध्य प्रदेश) यांनी त्यांच्या ताब्यातील आयशर टेम्पो क्रमांक एमएच ४६ बीएम ३९२५ हा मुंबई-गोवा महामार्गावर पार्किंग लाईट न लावता चुकीच्या व धोकादायक पद्धतीने उभा केला होता. त्यामुळे मागून येणाऱ्या बडा दोस्त टेम्पो क्रमांक एमएच १० डीटी ६५९६ ची त्याला जोरदार धडक बसली.

Poladpur Eicher Tempo Crash
Raigad accident : सायन-पनवेल महामार्गावर खारघर येथे भीषण अपघात; अग्निशमन जवानांनी चालकाला दिले जीवदान

अपघाताची माहिती मिळताच पोलादपूर पोलिसांसह काळभैरव रेस्क्यू टीमचे दीपक उतेकर, अरुण मोहिते व सहकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने बचावकार्य करून जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी पोलादपूर पोलीस ठाण्यात बलीराम सोलंकी यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६(१), १२५(अ), १२५(ब) व २८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news