Panvel Crime | कंपनीच्या गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांना अटक

पनवेल तालुका पोलिसांची कारवाई; १८० मशीन पार्ट्ससह ऑटोरिक्षा आणि बोलेरो पिकअप जप्त
Panvel Company Warehouse Theft Bust
लाखो रुपयांचे मशीनरी पार्ट्स चोरणाऱ्या टोळीचा पनवेल तालुका पोलिसांनी पर्दाफाश केलाPudhari
Published on
Updated on

Panvel Company Warehouse Theft Bust

पनवेल : वावंजे येथील इंजिनिअरिंग कंपनीच्या गोडाऊनमध्ये चोरी करून लाखो रुपयांचे मशीनरी पार्ट्स चोरणाऱ्या टोळीचा पनवेल तालुका पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या चौकशीत चार चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपींकडून चोरीचा ७ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल, तसेच गुन्ह्यात वापरलेली ४ लाख ८० हजार रुपये किमतीची वाहने असा एकूण १२ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दि. १४ ते १७ ऑगस्ट २०२६ दरम्यान वावंजे येथील एन. के. गार्डनजवळ असलेल्या एस. एस. इंजिनिअरिंग कंपनीच्या गोडाऊनमध्ये चोरट्यांनी घरफोडी केली होती. या घटनेत विविध मशीनरीचे तब्बल १८० स्टेनलेस स्टील पार्ट्स चोरीला गेले होते. या पार्ट्सची किंमत सुमारे ४ लाख ५० हजार रुपये होती. याप्रकरणी पनवेल तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Panvel Company Warehouse Theft Bust
Panvel Crime | सरकारी नोकरीच्या आमिषाने ३१ लाखांचा गंडा; वसईच्या गटशिक्षण अधिकाऱ्याला अटक

गुन्ह्याचा तपास तांत्रिक पद्धतीने सुरू असताना पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे तळोजा-खारघर परिसरात सापळा रचण्यात आला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन घाडगे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) आनंदा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे सहायक पोलिस निरीक्षक अनुरुध्द गिजे, पोलिस उपनिरीक्षक दीपक शेळके आणि पथकाने कारवाई करत मोहम्मद आलीम अली हसन मन्सुरी (४५, रा. खारघर), मोहम्मद इर्शाद अली हसन मन्सुरी (३३, रा. तळोजा) आणि कैस अनवर पटेल (३२, रा. तळोजा-पाचनंद) यांना ताब्यात घेऊन अटक केली.

न्यायालयाने तिन्ही आरोपींना २४ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस कोठडीतील चौकशीत आरोपींकडून वावंजे येथील गुन्ह्यातील ४ लाख ५० हजार रुपये किमतीचे १८० मशीन पार्ट्स जप्त करण्यात आले. तसेच चोरीसाठी वापरलेली ८० हजार रुपये किंमतीची ऑटोरिक्षा आणि ४ लाख रुपये किमतीची बोलेरो पिकअप पोलिसांनी ताब्यात घेतली.

Panvel Company Warehouse Theft Bust
Panvel crime : पनवेल रेल्वे पोलिसांकडून ३९ गुन्ह्यांतील सराईत चोर जेरबंद

आरोपींच्या चौकशीत पनवेल तालुका पोलिस ठाण्यात दाखल असलेले आणखी तीन गुन्हे उघडकीस आले. या गुन्ह्यांमध्ये ४६५ स्टेनलेस स्टील क्यूआरसी मेल पार्ट्स, सुमारे १ लाख ३९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल, तसेच १३३ किलो वजनाच्या तांब्याच्या तारा, सुमारे १ लाख ३३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अशा प्रकारे पोलिसांनी तिघांकडून एकूण चार चोरी च्या गुन्ह्यांची उकल केली आहे. आरोपींच्या इतर साथीदारांचा शोध सुरू असून, त्यांच्या चौकशीत आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news