

रायगड : राज्याच्या साहित्य परंपरेत र. वा. दिघे यांच्या मुळे खोपोली गावांला एक अनन्यसाधारण स्थान प्राप्त झाल्याने, त्यांचे खोपोली हे गांव राज्य शासनाकडून पुस्तकांचे गांव म्हणून घोषीत करण्यात येत असून येत्या 15 दिवसांत त्या बाबतचा अधिकृत शासन निर्णय देखील काढण्यात येईल अशी माहिती राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
रायगड जिल्ह्यातील खोपोली हे गांव कर्मभूमी असलेले मराठी भाषेतील नामवंत लेखक, कादंबरीकार पाणकळाकार रघुनाथ वामन दिघे तथा. र.वा. दिघे यांच्या ग्रामीण जीवनाच्या पार्श्वभूमीवरील लिहिलेल्या कादंबऱ्यांसाठी ते परिचित आहेत.
कादंबरीकार रघुनाथ वामन दिघे तथा. र. वा. दिघे यांच्या स्नूषा तथा कोकण मराठी साहित्य परिषदेच्या खोपोली शाखेच्या अध्यक्षा लेखीका व कवयित्री उज्वला वामन दिघे यांनी ग्रामीण कथा व कादंबरीकार र.वा. दिघे यांच्या साहित्यिक कार्याने सर्व परिचित असलेले खोपोली हे गाव 'पुस्तकांचे गाव व्हावे असा प्रस्ताव कोमसापतर्फे शासनाला द्यावा अशी कल्पना मांडली. कोमसाप खोपोली शाखेचे ज्येष्ठ सल्लागार साहित्यमित्र ल माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसुरकर, ज्येष्ठ रंगकर्मी व सल्लागार उल्हासराव देशमुख आदिनी या प्रस्तावाला होकार दर्शवीत आवश्यक ते मार्गदर्शन केले. त्या आधारे कोमसाप खोपोली शाखेच्या मासिक बैठकीत चर्चा करून त्याबद्दलचा प्रस्ताव तयार करण्यात आला. एका कार्यक्रमाच्या निमीत्ताने मराठी भाषा व उद्योग मंत्री उदय सामंत शनिवारी (दि.8) खोपोली येथे आले असता त्यांना हा प्रस्ताव सादर करण्यात आला. मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक र. वा. दिघे हे खोपोलीचे लेखक होते आणि त्यांच्या एकूण लेखन कार्याची माहिती यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांनी मंत्री उदय सामंत यांना दिली. आणि मंत्री उदय सामंत यांनी हा प्रस्ताव स्वीकारून तत्काळ आपल्या भाषणातच
खोपोलीला 'पुस्तकांचे गाव' करण्यात येईल अशी घोषणा केली आणि पुढील १५ दिवसात याबाबतचा शासन निर्णय निघेल असे जाहीर केले.कोकण मराठी साहित्य परिषदेचे सर्व पदाधिकारी, सदस्य, खोपोलीतील रसिक वाचक, साहित्य प्रेमी, साहित्य सेवा करणारे सर्व साहित्यिक, शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी, पत्रकार व समस्त खोपोलीकर नागरिकांसाठी 'पुस्तकांचे गाव' होणे ही खूप आनंदाची गोष्ट आहे, अशी प्रतिक्रीया कोकण मराठी साहित्य परिषदेच्या खोपोली शाखेच्या अध्यक्षा लेखीका व कवयित्री उज्वला दिघे यांनी दिली आहे.
त्यांच्या कादंबऱ्यांत वर्णिलेले कोकणातील जीवन, शेतकरी व आदिवासींची दुःखे, त्यांच्या व्यथा-वेदना वेशीवर टांगणारे होते. र.वा. दिघे, हे कोकणातल्या खंडाळा घाटाच्या पायथ्याचे खोपोली जवळच्या विहारी गावंचे शेतकरी होते. शतकऱ्यांमध्ये व आदिवासींमध्ये प्रत्यक्ष वावरून त्यांच्या जगण्यातली वास्तवता पहिल्यांदा र. वा. दिघे यांनी मराठी कादंबऱ्यांतून मांडली. आणि त्यांनी पावसावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्यथावेदना त्यांच्या पाणकळा या १९४० साली लिहिलेल्या पहिल्या कादंबरीतून जगासमोर आणल्या आणि त्या निमीत्ताने खोपोलीची नव्याने राज्याच्या साहित्य क्षेत्राला नव्याने ओळख झाली.
सर्व साहित्यिक, शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी, पत्रकार व समस्त खोपोलीकर नागरिकांसाठी 'पुस्तकांचे गाव' होणे ही खूप आनंदाची घटना आहे. अशी प्रतिक्रीया कोकण मराठी साहित्य परिषदेच्या खोपोली शाखेच्या अध्यक्षा लेखीका व कवयित्री उज्वला दिघे यांनी दिली आहे.