Raigad News | माणगावमध्ये कंटेनरखाली चिरडून तरुणाचा मृत्यू

माणगाव शहरातील तीनबत्ती नाक्यावरील घटना
माणगाव, रायगड
मोहम्मद रफी इस्माईल जामदार Pudhari News Network
Published on
Updated on

माणगाव : मुंबई गोवा महामार्गावर माणगाव शहरातील तीनबत्ती नाक्यावर कंटेनर खाली चिरडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

माणगांवमध्ये मुंबई-गोवा हायवेवर जुने माणगाव येथील तीन बत्ती नाका येथे २० मार्च रोजी सकाळी सव्वा अकराच्या दरम्यान महाड बाजूकडून मुंबई बाजूकडे जाणारा कंटेनर या कंटेनरच्या मागच्या टायरखाली येऊन जुने माणगांव येथील रा हणारा मोहम्मद रफी इस्माईल जामदार, वय वर्षे ३९ हा तरुण आपल्या ताब्यातील दुचाकी घेवुन जात असताना तीनबत्ती नाका येथे कंटेनरच्या मागील टायर खाली येऊन चिरडून मोहम्मद रफी इस्माईल जामदार याचा मृत्यू झाला आहे.

मोहम्मद रफी इस्माईल जामदार हे जुने माणगांव येथील रहिवासी असून व्यवसायाने इलेक्ट्रिशन प्लबिंग, एसी फ्रीज मेकॅनिक म्हणून कार्यरत होते. तसेच जामदार हे आपदा मित्र म्हणून माणगांवमध्ये साळुंखे रेस्क्यू टीममध्ये देखील कार्यरत होते. मोहम्मद रफी इस्माईल जामदारच्या पश्चात पत्नी व दोन मुली असा परिवार आहे.

माणगाव बायपासचे काम रखडले आहे. होळी सणासाठी कोकणात चाकरमानी येत असतात. माणगाव शहरात होळी सणापासून दररोज वाहतूककोंडी होत आहे. वाहनचालक बेशिस्तपणे वाहन चालवित असल्याने वाहतूककोंडी अधिक भर पडते. या अपघातानंतर संतप्त जमावाने आक्रमक भूमिका घेत मुंबई-गोवा महामार्ग रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. यावेळी घटनास्थळी माणगांव पोलीस ठाणे टीम, माणगांव वाहतूक पोलीस शाखा, महामार्ग पोलीस तातडीने दाखल झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news