

रेवदंडा : केंद्रीय बंदरे, जहाज वाहतूक आणि जलमार्ग मंत्रालया कडुन पारंपारिक मच्छिमारांची फसवणूक केल्यामुळे मासेमारी नौकांचे वारंवार आपघात होत आहेत. केंद्रीय मंंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी त्वरीत हस्तक्षेप करावा, सरचिटणीस, महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती किरण कोळी मार्फत मागणी करण्यात आली आहे.
सन 2018 साली प्रस्तावित व्यापारी मालवाहू जहाज मार्गाच्या विरोधात नॅशनल फिशवर्क्स फोरम व भारतातील 9 सागरी राज्य, 3 केंद्र शासित राज्य व अंदमान निकोबार च्या संघटनांनी आंदोलनाची घोषणा केल्यानंतर तत्कालीन केंद्रीय बंदरे, जहाज वाहतूक आणि जलमार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी राष्ट्रीय मच्छीमार संघटनेच्या शिष्टमंडळास दिल्ली कार्यालयात बोलावून चर्चा केली होती. त्यांच्या सूचनेनुसार डी.जी. शिपिंग, कांजूर मार्ग, मुंबई कार्यालयात अनेक बैठका अधिकार्यां सोबत चर्चा करण्यात आली. त्यानुसार गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक व तामिळनाडूच्या कन्या कुमारी पर्यंतचे पारंपारिक मासेमारी क्षेत्र वगळून 80 सागरी मैलाच्या बाहेरून (100 वाव बाहेरुन) सागरी क्षेत्र निक्ष्चित केले होते. तेव्हा पासून व्यापारी मालवाहू जहाजां चा कोणताही मच्छिमारांना त्रास नव्हता.
परंतु मागील दोन वर्षा पासून व्यापारी मालवाहू जहाज मार्ग बदलून पुन्हा पारंपारिक क्षेत्रामधून जहाजे वाहतूक करित असल्यामुळे , तिसाई, मढ, मुंबई , स्वर्गदीप, उत्तन, ठाणे व , श्री लक्ष्मी नारायण, मढ, मुंबई या मासेमारी नौकांना 14 ते 35 सागरी मैला पर्यंत महाराष्ट्रतील मुंबई, पालघर सागरी क्षेत्रात आपघात झालेले आहेत. गुजरात च्या नौकेला देखील अपघात झाल्याचे वृत्त आहे.
प्रस्तावित व्यापारी मालवाहू जहाज मार्ग विरोधात आंदोलन केले होते. तो मार्ग 80 सागरी मैला पर्यंत पुढे केल्याचे डी.जी. शिपिंग कार्यालयात झालेल्या बैठकीत सांगितले होते. तो मार्ग पुन्हा बदलून 15 ते 35 सागरी मैल व्यापारी मालवाहू जहाज मार्ग नेटवर दिसत आहे. याचा अर्थ केंद्रीय बंदरे, जहाज वाहतूक आणि जलमार्ग मंत्रालय, डी. जी. शिपिंग, या विभागाने पारंपारिक मच्छिमारांची फसवणूक केलेली आहे काय.? या बाबत केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी त्वरीत हस्तक्षेप करुन संबंधितांची बैठक आयोजित करून ठरल्यानुसार महाराष्ट्र राज्य सागरी क्षेत्रातील व्यापारी मालवाहू जहाज मार्ग 80 सागरी मैल पर्यंत करण्यासाठी सहकार्य करावे. व पारंपारिक मच्छिमारांवर अन्याय दुर करावा. अशी मागणी करण्यात आली आहे.
मागील दोन वर्षा पासून व्यापारी मालवाहू जहाज मार्ग बदलून पुन्हा पारंपारिक क्षेत्रामधून जहाजे वाहतूक करित असल्यामुळे , तिसाई, मढ, मुंबई , स्वर्गदीप, उत्तन, ठाणे व , श्री लक्ष्मी नारायण, मढ, मुंबई या मासेमारी नौकांना 14 ते 35 सागरी मैला पर्यंत महाराष्ट्रतील मुंबई, पालघर सागरी क्षेत्रात आपघात झालेले आहेत. गुजरात च्या नौकेला देखील अपघात झाल्याचे वृत्त आहे.