Raigad News | जिल्हा प्रशासनाची ग्रामपंचायत निवडणुकांसाठी तयारी

मतदार यादी कार्यक्रम जाहीर
Raigad News
जिल्हा प्रशासनाची ग्रामपंचायत निवडणुकांसाठी तयारीPudhari File Photo

रायगड : रायगड जिल्ह्यातील जानेवारी 2024 ते डिसेंबर 2024 या कालावधीमधील मुदत संपणार्‍या 240 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व 92 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणूकीसाठी मतदार यादी कार्यक्रम घेण्यात येत आहे. 9 जुलै रोजी प्रारुप मतदारयाद्यांची प्रसिद्ध होऊन 19 जुलै रोजी अंतिम याद्या प्रसिद्ध होणार आहेत.

नवनिर्मित, मागील निवडणुकांमध्ये चुकीची प्रभागरचना आणि बहिष्कार व इतर कारणांमुळे निवडणुका न होऊ शकलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू आहेत. ग्रामपंचायतीतील सदस्य आणि थेट सरपंचांच्या रिक्त झालेल्या जागांच्या पोटनिवडणुकांसाठी पारंपरिक पद्धतीने प्रक्रिया राबविण्यासाठी मतदार यादीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने घोषित केला आहे. एप्रिल-मे 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुक 2024 साठी वापरलेली विधानसभेची मतदार यादी यापुढे होणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकांसाठी मतदार यादी तयार करण्यासाठी वापरण्यात येईल असे अधिसूचीत करण्यात आले आहे. या मतदार यादी कार्यक्रमानुसार मतदार यादी लेखनिकांच्या काही चुका, दुसर्‍या प्रभागातील चुकून अंतर्भूत झालेले मतदार, संबंधित प्रभागातील मतदारांची नावे लोकसभा निवडणूक 2024 मध्ये वापरण्यात आलेल्या मतदार यादीत असूनही ग्रामपंचायतीच्या संबंधित प्रभागाच्या मतदार यादीमधून नावे वगळण्यात आली असल्यास, अशा मतदारांची नावे ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय मतदार यादीत समाविष्ट करणे आदी प्रक्रिया या कार्यक्रमात होणार आहे.

जिल्हयात 810 ग्रामपंचायती

रायगड जिल्ह्यातील जानेवारी 2024 ते डिसेंबर 2024 या कालावधीमधील मुदत संपणार्‍या 240 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व 92 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका होणार आहेत. 92 पोटनिवडणुकांमध्ये 13 थेट सरपंच पदाच्या निवडणूका आहेत. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2024 दरम्यान रायगड जिल्हयातील 240 ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. त्यात अलिबाग तालुक्यात 34, पेण 18, उरण 8, मुरुड 4, कर्जत 30, खालापूर 3, रोहा 26, तळा 18, म्हसळा 11, सुधागड 6, पनवेल 15, माणगाव 21, महाड 30 आणि श्रीवर्धन 16 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

रायगड जिल्हयात एकूण 810 ग्रामपंचायती आहेत. या निवडणुकांमुळे जिल्हयातील एक तृतीयांश ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक व पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु होणार असून गावागावातून आढावा घेण्यात सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.

प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी १९ जुलै ला

या मतदार यादी कार्यक्रमानुसार प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिध्दी 19 जुलै रोजी होईल. हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी ९ जुलै ते १५ जुलैपर्यंत आहे. प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी १९ जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news