Raigad News | कुर्डूस ग्रामपंचायतीमध्ये शासकीय निधीचा अपहार

28 लाखांच्या निधीमध्ये भ्रष्टाचार केल्याचा ठपका; पोलीसात गुन्हा दाखल
 Money fraud
कुर्डूस ग्रामपंचायतीमध्ये शासकीय निधीचा अपहारpudhari
Published on
Updated on

रायगड | कागदपत्रांमध्ये खाडाखोड करून शासकीय निधीचा अपहार केल्याच्या आरोपाखाली अलिबाग तालुक्यातील कुर्डूस ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अनंत पाटील आणि तत्कालीन ग्रामविकास अधिकारी सुनील म्हात्रे यांच्याविरुद्ध पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 28 लाख 70 हजारांचा अपहार केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

तालुक्यातील कुर्डूस ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच अनंत पाटील आणि ग्रामविकास अधिकारी सुनील म्हात्रे यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करून अभिलेखामध्ये खाडाखोड करून ग्रामपंचायत निधीचा आणि चौदाव्या वित्त आयोग निधीचा अपहार करून 28 लाख 70 हजार 458 इतक्या रकमेचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप गटविकास अधिकारी यांनी आपल्या फिर्यादीमध्ये केला आहे.

13 नोव्हेंबर 2019 ते 6 जानेवारी 2021 या कालावधीत हा अपहार झाला असल्याचा उल्लेख त्यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. पोयनाड पोलीस ठाण्यात याप्रकरणी अनंत पाटील व सुनील म्हात्रे यांच्या विरोधात 3 जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनंत पाटील व सुनील म्हात्रे यांनी पदाचा गैरवापर करून ग्रामपंचायत निधी तसेच केंद्र सरकारकडून आलेल्या चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीचा अपहार केला असून, त्याची योग्य ती चौकशी करून त्यांच्याविरोधात फौजदारी खटला दाखल करावा, असा अर्ज गावातील सुनील पिंगळे व मिलिंद पाटील यांनी कोकण आयुक्तांकडे जानेवारी 2021 मध्ये केला होता. त्यानुसार रायगड जिल्हा परिषदेने त्याची चौकशी सुरू केली. त्यावेळच्या गटविकास अधिकारी डॉ. दीप्ती देशमुख यांनी चौकशी करून अनंत पाटील व सुनील म्हात्रे यांनी निधीचा अपहार केला असल्याचा अहवाल दिला होता.

सुनील म्हात्रे यांची खातेचौकशी करण्यात आली. त्या अनुषंगाने कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात घेण्यात आलेल्या सुनावणीच्या वेळी ग्रामविकास अधिकारी सुनील म्हात्रे यांनी पाच दोषारोप मान्य केल्याचा अहवाल सहाय्यक आयुक्त (कोकण) यांनी दिला आहे. हा गुन्हा पोयनाड पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.

तत्कालीन गटविकास अधिकारी डॉ. दीप्ती देशमुख यांनी चौकशी करून अनंत पाटील व सुनील म्हात्रे यांनी निधीचा अपहार केला असल्याचा अहवाल दिला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news