Raigad news | महाड चवदार तळे सत्याग्रहाच्या 99 व्या वर्धापन दिनानिमित्त भीमसैनिकांचा महासागर लोटला

रायगड पोलीस दलातर्फे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना दिली
Raigad news | महाड चवदार तळे सत्याग्रहाच्या 99 व्या वर्धापन दिनानिमित्त भीमसैनिकांचा महासागर लोटला
Published on
Updated on

श्रीकृष्ण बाळ

महाड : अखिल मानव जातीला सामाजिक समतेचा संदेश देणाऱ्या 20 मार्च 1927 रोजी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडच्या चवदार तळे येथे केलेल्या पाणी सत्याग्रहाचे हे 99 वर्ष आहे. यानिमित्ताने कालपासूनच महाडमध्ये लाखो भीमसैनिक, अनुयायी यांनी सुरुवात झाली आहे.

आज सकाळी साडेआठ वाजता रायगड पोलीस दलातर्फे 21 पोलीस कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना चवदार तळ्याच्या प्रांगणा मध्ये मानवंदना दिली.

याप्रसंगी राज्याचे मंत्री नामदार संजय शिरसाठ व मंत्री भरत शेठ गोगावले यांसह विविध शासकीय अधिकारी लोकप्रतिनिधी नगराध्यक्ष उपस्थित होते. सकाळी साडेनऊच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार यांचे आगमन महाड येथे होणार असून मंत्री अदिती ताई तटकरे, खासदार सुनील तटकरे हे देखील या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित राहतील अशी माहिती प्राप्त झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news