Gas Leak Raigad : इंडो अमाईन्स लिमिटेड गॅस गळती; 36 कामगारांना बाधा, एकाचा मृत्यू, एक अत्यवस्थ

गॅस लिक झाला अन् कामगारांच्या नाक, डोळे आणि तोंडावर आल्याने कामगार चक्कर येऊन बेशुद्ध झाले
Gas Leak Raigad
Gas Leak Raigad
Published on
Updated on

महाड: स्वातंत्र्यदिनी (15 ऑगस्ट) सायंकाळच्या सुमारास महाड एमआयडीसीमध्ये कार्यरत असलेली इंडो अमाईन्स लिमिटेड या कंपनीमध्ये अचानक गॅस गळती झाली. गॅस लिक झाला अन् कामगारांच्या नाक, डोळे आणि तोंडावर आल्याने कामगार चक्कर येऊन बेशुद्ध झाले. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला, तर एक गंभीर झाला आहे.

Gas Leak Raigad
Parbhani Gas Cylinder Leak | गॅस सिलेंडर गळतीमुळे आग; एकाच कुटुंबातील चौघे भाजले

सूत्राच्या माहितीनुसार पाऊस पडत असल्याने पावसाच्या पाण्यावाटे गॅस बाहेर पडल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या कामगार वर्गांनाही गॅसची बाधा झाली. जवळपास 36 जणांना वायु बाधा झाल्याने उपचार करण्यासाठी महाड एमआयडीसी एम एम ए हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु काही कामगारांची प्रकृती चिंताजनक झाल्याने महाड येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना दोन कामगारांना मुंबई येथे उपचारासाठी पाठवण्यात आले.

Gas Leak Raigad
Satara Chlorine Gas Leak: शानभागमध्ये क्लोरीन गॅस गळती; विद्यार्थी गुदमरले

मिळालेल्या माहितीनुसार यापैकी एक कामगार मृत्यू झाल्याची घटना समोर येत आहे. पुढील तपास महाड एमआयडीसी चे अधिकारी करीत आहे. ही माहिती प्रथमदर्शनी आहे या घटनेची गंभीर दखल घेऊन फॅक्टरी इन्स्पेक्टर श्री तांबोळी व महाडचे प्रभारी डीवायएसपी श्री शशिकांत पवार यांनी सकाळी दहा वाजता कंपनीमध्ये भेट दिली. कंपनी व्यवस्थापनाबरोबर त्यांची चर्चा या झालेल्या अपघाता संदर्भात सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news