Raigad News | जि.प.च्या महिला व बालकल्याण विभागातील वादग्रस्त टेंडर रद्द

नव्याने काढले ईटेंडर. तक्रारीनंतर रायगड जिल्हा परीषदेची तातडीने कारवाई
Raigad Zilla Parishad
रायगड जिल्हा परिषदPudhari News Network
Published on
Updated on

अलिबाग : रायगड जिल्हा परीषदेमध्ये महिला व बालकल्याचा विभागातील ई निविदा घोटाळा समोर आला असून महिला व बालकल्याणच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी निर्मला कुचीक यांच्या विरोधात थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्याकडे ईमेलव्दारे तक्रार दाखल केल्यानंतर रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने वादग्रस्त टेंडर रद्द करून नव्याने ईटेंडर काढले आहे. याबाबतची तक्रार सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी केली आहे.

रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत संदर्भीय ई-निविदा प्रकाशित केलेली आहे. सदर निविदेत निर्मला कुचीक उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण यांनी पद व अधिकाराचा गैरवापर करुन ठराविक व्यक्तिंला काम देण्यासाठी गैरप्रकार केल्याचे दिसून येत आहे अशी तक्रार केली होती. याबाबत सावंत यांनी ऑनलाईन प्रसिद्ध केलेल्या निविदेत जी निविदा प्रसिद्ध केलेली आहे ती लॉक असुन त्यातच वस्तुंचा नग, दर, अंदाजित दर, पुरवठादाराने भरावयाचे दर हे दिलेले आहेत .पण लॉक केल्यामुळे दिसत नाहीत. परिणामी दर भरता येवु शकत नाही. नविदेची हेडींग सुशोभिकरण असे आहे. याध्ये सोलर पॅनल, फिल्टर, वॉशबेसिन व नळ, कार्पेट, स्मार्ट टिव्हि, फॅन्सीनेट यांचे दर मागविले असल्याचे नमूद केले आहे.

यापूर्वी देखील वेळोवेळी लेखी व तोंडी तक्रार करुनही निर्मला कुचीक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण व सर्व यंत्रणा ठराविक पुरवठारास काम देण्यासाठी मदत करीत असल्याचे निर्दशनास आले असल्याची तक्रार केली होती. षेवटी सावंत यांच्या तक्रारीची दखल घेवनू वादग्रस्त निविदा रद्द करून आज दि. 28 रोजी नव्याने ईटेंडर काढले असून त्याची अंतिम तारीख दि. 17 मार्च 2025 अशी आहे.

15 दिवसांची मुदत 10 दिवसांवर

50 लाखांच्या कामासाठी शासन निर्णयानुसार 15 दिवस मुदत देणे अपेक्षित होते पण फक्त 10 दिवस मुदत दिलेली आहे 50 लाखांच्या कामासाठी निविदा फी रुपये रू.5,700 व अनामत रक्कम रुपये रू.95,000 रुपये घेणे अपेक्षित होते पण ठराविक व्यक्तिंच्या फायद्यासाठी निविदा फी रुपये 1000/- व अनामत रक्कम रुपये 50,000/- ठेवली आहे.निविदा सुचनेत अट क्रमांक 18 नुसार दर सादर करणेपुर्वी अंगणवाडी रंग कामाचे फोटो या कार्यालयात दाखवुन त्याची पहाणी केल्याचा दाखला या कार्यालयातून घेऊन तो जोडण्याचा बंधनकारक असेल असा उल्लेख आहे. यात येणार्‍याा सुटया, निविदा प्रकियेत कामाचे स्वरुप न देणे, मुदतीपुर्वीच पुरवठादार माहित होणे यावरुन गोपनियतेचा भंग झाला असल्याची तक्रारही करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news