Raigad News | अचारसंहिता लागली, अवैध दारू धंद्यांवर कारवाईचा बडगा

दोन दिवसात 2 लाखांचा मुद्देमाल जप्त

Raigad News | A code of conduct was introduced, action was taken against illegal liquor businesses
अचारसंहिता लागली, अवैध दारू धंद्यांवर कारवाईचा बडगाPudhari Photo
Published on
Updated on

रायगड : विधानसभा निवडणूक जाहीर झाल्याने जिल्हा प्रशासनाच्या विविध यंत्रणा कामाला लागल्या आहेत. आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे यासाठी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सर्व यंत्रणांना सूचना दिल्या आहेत. जिल्ह्याचा पोलीस विभाग आणि राज्य उत्पादन विभाग या विभागांवर निवडणूक काळात मोठी जबाबदारी असून विभागाने निवडणूक जाहीर झाल्यापासून केवळ दोन दिवसात 2 लाख 21 हजार 425 रुपये किंमतीचा अवैध दारुचा मुद्देमाल जप्त केला आहे.

विधानसभा निवडणूक सन 2024 च्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून 15 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबरपर्यंत एकूण 18 गुन्हे नोंदविण्यात आलेले असून 19 आरोपींना अटक करण्यात आली आहे. संपूर्ण कारवाईमध्ये 5 हजार 60.12 लि. दारु जप्त करण्यात आली असून एकूण जप्त मुद्देमालाची किंमत रुपये 2 लाख 71 हजार 425 आहे.

अवैध मद्याच्या व्यवसायात गुंतलेल्या सराईत इसमांविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 मधील कलम 93 अंतर्गत एकूण 60 प्रस्ताव विधानसभा मतदारसंघातील उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे दाखल करण्यात आले असून पैकी 13 कलम 93 अंतर्गत बंधपत्र करुन घेण्यात आले आहेत. तसेच संशयित आरोपी ज्ञात पत्यावर भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 168 (फौजदारी प्रक्रीया संहितेच्या कलम 149) नुसार संबंधीताना गुन्हयापासून परावृत्त करण्याकरीता एकूण 362 कायदेशीर नोटीस देण्यात आल्या आहेत.

रायगड जिल्ह्यात विधानसभा निवडणुक 2024 आचारसंहिता कालावधीत सर्व मद्य उत्पादक घटक, ठोक विक्री व किरकोळ विक्री अनुज्ञप्तीवर प्रभावी नियत्रंण ठेवण्याकरीता अनुज्ञप्त्यांच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच सदरचे कंट्रोल रुम या कार्यालयात कार्यान्वित करण्यात आले आहे.

विधानसभा निवडणुक 2024 आचारसंहिता कालावधीत या विभागाची 7 पथके तैनात असून पथकांस आंतरराजीय मद्य तस्करी होणार नाही तसेच बेकायदेशीर हातभट्टी दारु निर्मिती व विक्री केंद्र व वाहतूक यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. तसेच कोणत्याही प्रकारची अवैध मद्य वाहतूक होणार नाही याकरीता रायगड जिल्हयात शेडूंग, ता-खालापूर, खारपाडा, ता-पेण व चांदवे, ता. पोलादपूर येथे 2 तपासणी नाके उभारण्यात आले असून तेथे संशयित वाहनांची सखोल तपासणी करण्यात येत आहे. तसेच अवैध मद्यविक्री करणारे ढाबे, हॉटेल, टपर्‍या यांच्यावर वारंवार कारवाई करण्यात येत आहे.

सर्व नागरीकांनी विधानसभा निवडणूक 2024 मुक्त व निर्भयपणे पार पाडावी याकरीता विधानसभा मतदारसंघात मतदारांना दारुचे प्रलोभन देत असल्याचे निदर्शनांस आल्यास तसेच अवैध मद्य निर्मिती व विक्रीबाबत काही तक्रारी असल्यास या विभागाचा व्हॉटस अ‍ॅप 8422001133 व टोल फ्री क्रमांक 18002339999 व अधीक्षक कार्यालय रायगड येथील दुरध्वनी क्रमांक 02141-228001 वर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news