रायगड : उन्हाळी सुटीत मुरुड जंजिर्‍याला पर्यटकांचे येणार उधाण

वॉटर पार्क, बोटिंग, घोडागाडी सफारीचे पर्यटकांना मोठे आकर्षण
मुरुड जंजिरा, रायगड
मुरुड समुद्रकिनारी सद्द्य लाटा उसळू लागल्यात येणारे पर्यटक उत्साहात लाटा मध्ये जातात आणि अंदाज न आल्याने अपघात घडतो आणि किनारे बदनाम होतात पर्यटकांनी सावध होणे गरजेचे आहे. (छाया सुधीर नाझरे)
Published on
Updated on

मुरुड जंजिरा : सुधीर नाझरे

मुरुड शहरात सद्या पारा सकाळी 32 वर असतो. सकाळी थंड तर दुपारी गरम वातावरण असल्याने समुद्राच्या गार पाण्यात कुल कुल होण्यासाठी पर्यटकांना मुरुडला उन्हाळी सुटी मुरुडला एन्जॉय करायला मिळणार आहे. त्यात नुकतेच पार्क सुरु झाल्याने मुरुडला पर्यटक आता दोन दिवस राहून आनंद घेताना दिसत आहेत. समुद्राकिनारा सुशोभीकरण केल्याने 400 वाहने पार्कींगची जागा तयार झाल्याने पर्यटक खुश आहेत, सायंकाळी संपूर्ण किनार्‍यावर सोलर दिवे लावल्याने मंद प्रकाशात किनारा परदेशी किनारीपेक्षा सुंदर दिसत असतो.

राज्यात सर्वत्र परीक्षेचा हंगाम संपल्याने कोकणातील समुद्र किनार्‍यांकडे पर्यटकांनी धाव घेतली आहे. पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी वाढली आहे, सट्टी लागून आलेल्या वीकएण्डमुळे पर्यटनप्रेमींना भरपूर आनंद घेता येणार असून, मुरुड शहरात सायंकाळी अल्हाददायक व सुंदर वातावरण बनले आहे. समुद्र शांत असल्याने मासेमारी चांगली होत असल्याने पर्यटकांना मनसोक्त ताजे मासे खाण्याचा आनंद घेता येत आहेत. मुरुड समुद्रकिनारी असलेली हॉटेल्स उन्हाळी सुटीसाठी सज्ज झाली आहेत. समुद्रकिनार्‍यावरील सर्व हॉटेल गरम वातावरणांमुळे वातानुकूलित करण्यात आलीत, नवनवीन चविष्ट पदार्थांचे स्टोल समुद्रावर घोडेसवारी, मोटार बाईक, पाणीपुरी, भेळपुरी अशा विविध स्टॉलने किनारा बहरला आहे. न.पा.ने समुद्रकिनारी असलेली विश्रामधाम बागेचे नूतनीकरण केल्याने त्याचा लाभ पर्यटकांना होणार आहे. पालिकेचे कर्मचारी समुद्रकिनारा दिवसातून 3 वेळा स्वच्छता करत असतात. मुरुडला असणारे जलदुर्ग जंजिरा व पद्मदुर्ग पर्यटकांसाठी सज्ज झालेत. मुरुडपासून जवळच असणारे गारंबी धारण, कुडे मांदाड लेणी, खोकरी, दत्तमंदिर या पर्यटन स्थळांवर स्वच्छता करून खाण्यापिण्याचे स्टॉल ठेवण्यात आले आहेत.

दरवर्षी उन्हाळी सुटीत मी माझे कुटुंब मुरुडला येतो. समुद्र किनारी हॉटेलवर राहतो पण यावर्षी मुरुड शहरात खूप सुधारणा झाल्यात. रस्ते चांगले झालेत. किनार्‍यावर बोटिंग, बाईक राईड मुरूड शहर घोडागाडीतून पाहणायच आनंद घेतला तो कधीच विसरणार नाही. 1 दिवस पदामदुर्ग केला पाहून किनार्‍यावर संपला दुसर्‍या दिवशी वॉटर पार्कमध्ये मजा केली सायंकाळी पुन्हा हवेत उडालो आणि जंजिरा किल्ला आकाशातून पहिला आणि रात्री पार्टीच्या प्रवासाला निघालो.

वंदना खटावकर, पर्यटक ठाणे

रविवार सुटीसाठी मुरुड तयार आहे. पिण्याचे पाणी, शहरातील रस्ते व समुद्रलकिनार स्वछता, याकडे जातीने लक्ष दिल्याने पर्यटकांना त्रास होणार नाही. पर्यटकांनी समुद्रात जाताना भरती ओहोटी याचे भान ठेऊन समुद्राच्या लाटांचा सुरक्षित आनंद घेण्याचे आव्हान केले आहे.

सचिन बच्छाव, मुख्याधिकारी मुरुड नगर पालिका, नाशिक.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news