

मुरुड जंजिरा ः मुरुड जंजिरा हे पर्यटनस्थळ असल्यामुळे पर्यटक मुरुडला खास ताजे मासे खाण्यासाठी येतात.मुरुड शहराला इतिहास असल्याने 2 समुद्रातील जलदुर्ग व विशाल स्वच्छ सुंदर समुद्रकिनारी पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना येथिल कोळी बांधव गेली अनेक वर्ष ताजी मासळी वाजवी दारात देतात व पर्यटकांचे मुरुडला येण्याबाबतचे आकर्षण वाढवतात अश्या कोळी बांधवाच्या मासेमारीबाबत समस्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे.
मुरूडचे मच्छिमार रोज सकाळी 5 वाजता उठून खोल समुद्रात मासेमारीसाठी जातात.हवामान चांगले असेल व नशीब साथ देईल तर जाळ्यात मासे मिळतात व मिळालेले मासे मुरुड किनाऱ्यावर आणून मुरुड मासळी बाजारात विक्रीसाठी आणतात.परंतु आणताना त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. प्रथम मुरुड किनारीवर बोटींबाधण्यासाठी जेटी नसल्याने बोट वाळूत उभी करावी लागते.वाळूत लावताना बोटीचा खालील भाग वाळूत अडकतो व नुकसान होते,दुसरे मासेमारीसाठी जाताना बोटीत जाळी चढवणे, डिझेलचे ड्रम चढवणे,मासेमारीसाठी लागणार बर्फ नेण्याचे काम 4 फूट पाण्यातून डोक्यावर वाहून नेऊन करावे लागते,त्यात मनुष्यबळ जास्त लागते व वेळही जास्त लागतो त्यात मासळीचा दुष्काळ असल्याने मच्छिमार सतत नुकसान सहन करत आहे.
अदयावत जेटी झाल्यास बोट सुरक्षित धोक्याला लावता येईल.जाळी,डिझेल नेणारा टेम्पो बोटी जवळपर्यंत जाईल,भरती ओहोटीला समुद्रात जाणे सोपे होईल.काही वर्षापुरवी एकदरा किनाऱ्यावर जेटी बांधण्यात आली पण चुकीची बांधल्याने फक्त मासे सुकवण्यासाठीच वापर होतो.परंतु मुरुड किनाऱ्यावर गेल्या 100 वर्षात बांधण्यात आली नाही.अनेकदा प्रस्ताव बनले, परंतु निधी नसल्याने मच्छिमार उपेक्षितच राहिला.