Raigad Murder | स्वतःच्याच तरुण मुलाचा निर्घृणपणे खून : पोलादपूर तालुक्यातील धक्कादायक प्रकार!

फरार बापाला पाच तासांत केले जेरबंद
आरोपी सचिन चिकणे
आरोपी सचिन चिकणे
Published on
Updated on

Young boy killed by father Raigad पोलादपूर : तालुक्यातील ओंबळी गावातील मूळ रहिवासी असलेल्या कुटुंबातील बापाने स्वतःच्याच तरुण मुलाला धारदार शस्त्राने रक्तबंबाळ करून खून केला. पोलादपूर शहरानजीक लोहारे देऊळकोंड येथे ही घटना घडल्यानंतर संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली.

पोलादपूर शहरानजीकच्या लोहारे देऊळकोंड येथील आडरस्त्यावरील निर्जन इमारतीत हा प्रकार घडला. यामध्ये पोलादपूर तालुक्यातील ओंबळी गावातील सचिन बजरंग चिकणे याने अज्ञात कारणावरून संतप्त होऊन स्वतःचा तरुण मुलगा साहिल सचिन चिकणे (वय २४ वर्षे) याला धारदार शस्त्राने हल्ला करून ठार केले. या घटनेनंतर सचिन चिकणे याने पलायन केले.

या प्रकाराची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विजय सुर्वे, हवालदार स्वप्नील कदम, सुतार तसेच अन्य महिला व पोलीस कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले. महाड उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप काळे यांनी यांनी वाहतूक पोलिस आणि साध्या वेशात महाड शहराबाहेरील बी.एस. बुटाला सभागृहालगत मुंबई गोवा महामार्गाच्या सर्व्हिस रोडवरील सापळा रचून मोबाईल लोकेशन व गुप्त माहितीच्या आधारे आरोपी सचिन चिकणे याला ताब्यात घेतले.

दरम्यान, सहायक पोलिस निरीक्षक विजय सुर्वे यांनी फॉरेन्सिक टीमला पाचारण करीत गुन्ह्याचे ठिकाण असलेले घर संरक्षित केले. फॉरेन्सिक टीमकडून गुन्ह्याचे कारण व घटनाक्रम याचा संदर्भ तसेच त्यावेळी घडलेल्या शक्यतांचा अभ्यास सुरू केला.

पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात मृत साहिल चिकणे याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सायंकाळी उशिरा पोलिसांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news