Raigad bus accident
रायगड
Raigad bus accident: रायगडच्या माझेरी घाटात ST बसला अपघात; चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली
Majeri Ghat ST bus accident latest news: ST बस नादुरुस्त असल्याचा प्रवाशांचा आरोप
महाड: महाड-भोर रस्त्यावरील माझेरी घाटात रामदास पठार-मुंबई एसटी (ST) बसला अपघात झाला. बस चालकाने प्रसंगावधान राखत अनियंत्रित ST बस रस्ताच्या विरुद्ध बाजूस डोंगर भागात नेल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. ही बस रामदास पठारहून महाडला निघाली होती.
या बसमधून 20 विद्यार्थी आणि 12 ग्रामस्थ प्रवास करीत होते. अपघातदरम्यान अनेकांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना वरंध येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथोमोपचार देण्यात आले. हि ST बस नादुरुस्त असल्याचा आरोप प्रवाशांकडून केला जात आहे.

