Raigad Mahavitaran News | बारशिवात हाय व्होल्टेजमुळे घरगुती उपकरणांचे नुकसान

महावितरणने तातडीने नुकसानभरपाई द्यावी अन्यथा आंदोलन -ग्रामस्थांचा इशारा
मुरुड जंजिरा
बारशिव गावासाठी असणार्‍या ट्रान्सफॉर्मर मध्ये स्फोट होऊन हाय व्होल्टेज मुळे अनेक घरातील वस्तूंचे नुकसान झाले.Pudhari News Network
Published on
Updated on

मुरुड जंजिरा : सुधीर नाझरे

मुरुड तालुक्यातील भाईघर ग्रामपंचायत हद्दीमधील बारशिव गावात 11 फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजून 30 मिनिट असताना बारशिव गावासाठी असणार्‍या ट्रान्सफॉर्मर मध्ये स्फोट होऊन हाय व्होल्टेज मुळे अनेक घरातील टीव्ही,फ्रीज,मिक्सर, एसी,इन्व्हेटर्स अशा असंख्य घरगुती व जीवनावश्यक वस्तू जळून जाऊन निकामी झाल्या आहेत. त्यामुळे या गावातील सुमारे 28 लोकांच्या घरातील मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

यासाठी भाईघर ग्रामपंचायत सरपंच हर्षद महाडिक, उपसरपंच प्रसाद चौलकर,सामाजिक कार्यकर्ते अमित गोपाळे यांनी मुरुड महावितरणचे उप मुख्य कार्यकारी अभियंता सूर्यवंशी साहेब व मुरुड तहसीलदार रोहन शिंदे यांना रीतसर निवेदन देऊन महावितरणे नुकसान झालेल्या घरातील व्यक्तीस योग्य ती भरपाई द्यावी अन्यथा दुर्लक्ष केल्यास मोठे जन आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी त्यांनी दिला आहे. बारशिव गावात 560 लोकांची वस्ती असून येथील बहु संख्य लोक वीज ग्राहक आहेत.

11 फेब्रुवारी रोजी अचानक पने बारशिव येथील विद्युत पुरवठा हाय व्होल्टेज झाल्याने ट्रासफॉर्मर मध्ये स्फोट होऊन बारशिव गावातील घरगुती वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महावितरणे सदरील झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात यावे व झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यात यावी अशी मागणी ग्रामपंचायत ग्रामस्थ यांच्या कडून करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती सांगताना भाईघर ग्रामपंचायत सरपंच हर्षद महाडिक, उपसरपंच प्रसाद चौलकर,सामाजिक कार्यकर्ते अमित गोपाळे यांनी सांगितले की आम्ही रीतसर अर्ज देऊन महावितरणे पाहणी करून रीतसर पंचनामे करून ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांना त्वरित भरपाई द्यावी ही मागणी केली आहे. या घटनेमध्ये वीज वापरणार्‍या ग्राहकाचा कोणताही दोष नाही. योग्य निगा न राखल्यामुळे असे प्रकार बारशिव गावात तीन महिन्यानंतर घडत आहेत. याची सर्वस्वी जबाबदारी महावितरण विभागाची असून त्यांनी नुकसान झालेल्या घरातील व्यक्तीस तातडीने भरपाई द्यावी जर आमच्या मागणी कडे महावितरणे दुर्लक्ष केले तर मोठे जनादोलन ग्रामस्थ यांच्या वतीने छेडण्यात येईल, असा इशारा पत्रकारांशी बोलताना दिला आहे. मुरुड महावितरण या बाबीकडे कसे लक्ष देते हे त्यांच्या कृतीमधून दिसणार आहे अन्यथा लोकांचे मोठे नुकसान झाल्याने लोक रस्त्यावर येणार ही परिस्थिती स्पष्ट दिसत आहे.

पंचनामे करण्याची मागणी

11 फेब्रुवारी रोजी अचानक पने बारशिव येथील विद्युत पुरवठा हाय व्होल्टेज झाल्याने ट्रासफॉर्मर मध्ये स्फोट होऊन बारशिव गावातील घरगुती वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महावितरणे सदरील झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात यावे व झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यात यावी अशी मागणी ग्रामपंचायत ग्रामस्थ यांच्या कडून करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news