Raigad News : कोकणातील आदर्श सरपंचांचा होणार भव्य सन्मान
रायगड : कोकणातील ‘आदर्श सरपंचांचा सन्मान’ आणि ‘आदर्श गाव बनवू या’ अशी मोहिम दैनिक पुढारीने हाती घेतली असून या मोहिमेचा शुभारंभ सोेहळा 18 जून 2025 रोजी आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल येथे ग्रामविकास, पंचायत मंत्री श्री. जयकुमार गोरे आणि श्री. भरतशेठ गोगावले मंत्री रोजगार हमी, फलोत्पादन, खारभूमी विकास यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
गाव विकासाची प्रशासकीय जबाबदारी असलेले कोकण विभागीय आयुक्त श्री. विजय सुर्यवंशी तसेच श्री. किशन जावळे, जिल्हाधिकारी रायगड, श्रीमती नेहा भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. रायगड, रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल, श्री. रोहन घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. ठाणे, श्री. मनोज रानडे, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. पालघर, पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे, पनवेल महापालिका माजी विरोधीपक्ष नेते प्रितम म्हात्रे आदी उपस्थित रहाणार आहेत.
या कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी ज्यांचा सहभाग मोलाचा आहे असे आमदार प्रशांत ठाकूर, लोकनेते रामशेठ ठाकूर, श्री. प्रितम म्हात्रे आणि पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यावेळी उपस्थित राहणार आहेत.
कोकणातील रायगड, ठाणे, पालघर या जिल्ह्यातील 40 आदर्श सरपंचांचा यावेळी सन्मान केला जाणार आहे. दै. पुढारीतर्फे मलेरिया मुक्तीसाठीही विशेष अभियान राबविले जात आहे. याचाही शुभारंभ यावेळी होणार आहे. स्वयंपूर्ण गाव आणि सक्षम गाव ही संकल्पना घेऊन हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
आदर्श गाव आणि स्वयंपूर्ण गाव ही संकल्पना स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच मांडली गेली. या संकपल्पनेचे प्रणेते राष्ट्रपिता महात्मा गांधी होते. आज रायगड, ठाणे आणि पालघर या वाढत्या शहरीकरणाच्या जिल्ह्यातही गावपण जपणारी गावे आहेत. या गावांचा स्वयंपूर्ण विकास अशी संकल्पना डोळ्यासमोर ठेऊनच दैनिक पुढारीने आदर्श सरपंच सन्मान असा आगळा उपक्रम बुधवार 18 जून रोजी दुपारी 3 वाजता पनवेल येथील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित केला आहे.
हे आहेत सत्कारमूर्ती
सन्मानित करण्यात येणार्या या आदर्श सरपंचांमध्ये रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील खंडाळे ग्रामपंचायतीचे सरपंच नासिकेत कावजी, नारंगी ग्रामपंचायतीचे सरपंच उदय बाबू म्हात्रे, आवास ग्रामपंचायतीच्या सरपंच अभिलाषा अभिजित राणे, सारळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अमित नाईक, मानतर्फे झिराड ग्रामपंचायतीचे उपसरपंच राकेश पाटील, कर्जत तालुक्यातील कोल्हारे ग्रामपंचायतीचे सरपंच महेश विरले, उरण तालुक्यातील चाणजे ग्रामपंचायतीचे अजय म्हात्रे, पागोटे ग्रामपंचायतीचे सरपंच कुणाल पाटील, नवघर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच रवीशेठ वाजेकर, पेण तालुक्यातील वाशी ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप ठाकूर, महाड तालुक्यातील लोअर तुडील ग्रामपंचायतीचे सरपंच उमरखान देशमुख, लाडवली ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. मुबिना निसार ढोकले, गोंडाळे ग्रामपंचायतीचे सरपंच आशिष अशोक खताते, शिरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच सोमनाथ ओझर्डे, खालापूर तालुक्यातील साजगाव ग्रामपंचायतीचे सरपंच विनोद वामन कवळे, म्हसळा तालुक्यातील कणघर ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. रश्मी संतोष सावंत, तळा तालुक्यातील गिरणे ग्रामपंचायतीचे उपसरपंच नागेश नरेंद्र लोखंडे, प्रमोद भिंगारकर सरपंच ग्रामपंचात विचुंबे, मंगेश शेलार सरपंच ग्रामपंचायत करंजाडे, सौ. योगिता राजेश पाटील सरपंच ग्रामपंचायत पालीदेव, सौ. भारती सचिन पाटील सरपंच ग्रामपंचायत आकुर्ली, अजित वसंत पाटील, सरपंच ग्रुप ग्रामपंचायत वेश्वी-उरण आणि माणगाव तालुक्यातील लोकप्रतिनिधी प्रमोद रामचंद्र घोसाळकर, मापगाव येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन हरिश्चंद्र घाडी, पेण येथील लोकप्रतिनिधी समीर म्हात्रे यांचा सन्मान होणार आहे.
रविंद्र विशे, सरपंच, पडघा-भिवंडी, शिवाजी बाळाराम पाटील, सरपंच, उसाटणे, कल्याण, दिनेश दत्तात्रेय ठाकरे, सरपंच डोव्हावे, भिवंडी, प्रेमनाथ बाळाराम वाडोलकर, सरपंच, वडपे-भिवंडी, दिपाली दिलीप केदार, सरपंच, कुरुंद-भिवंडी, राहुल चंदे, उपसरपंच, आसनगांव-शहापूर, कमल रेरा, सरपंच, नडगांव-शहापूर, नरेश रेरा, माजी सरपंच, नडगांव-शहापूर, पुनम सुनील जाधव, सरपंच, नेवाळी-कल्याण, गीता गवारी, सरपंच, सुर्यमाळ-मोखाडा, मुरलीधर कडू, सरपंच, कोरेगांव-मोखाडा, अनिल खिलारे, सरपंच, गोरे-वाडा, सुहास केशव केंबारी, सरपंच, टेंभरे (बु.)-मुरबाड, आणि सम्मौका रविराज पाटील, सरपंच, काल्हेर, भिवंडी यांचा समावेश आहे.
सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने दैनिक पुढारीच्या वाचकांसाठी प्रसाद खांडेकर आणि व्ही. आर. प्रॉडक्शन्स प्रस्तूत थेट तुमच्या घरातून या धमाल विनोदी नाटकाची पर्वणी मिळणार आहे.
सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने दैनिक पुढारीच्या वाचकांसाठी प्रसाद खांडेकर आणि व्ही. आर. प्रॉडक्शन्स प्रस्तुत भेट तुमच्या घरातून या धमाल विनोदी नाटकाची पर्वणी मिळणार आहे.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा विशेष सन्मान
अमृतमहोत्सवी चाइदिवस साजरा करणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा सन्मान या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. तसेच कोकणातील आदर्श काम करणाऱ्या ४० सरपंचांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे. आदर्श गाव करूया या दैनिक पुढारीच्या संकल्पनेला अनुसरून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. गाव खेड्यांचा विकास हाच केंद्रबिंदू ठेवून राज्य सरकारच्या ग्रामविकास, पंचायतराज, रोजगार हमी, फलोत्पादन, खारभूमी विकास या खार्त्यांच्या पुढाकारे कोकणच्या विकासाचा अजेंडा यात तयार केला जाणार आहे. दोन्ही खात्याचे मंत्री याबाबतची भूमिका मांडणार आहेत.

