Raigad farming cost increase: ऐन हंगामात महागाईमुळे शेतकरी हवालदिल

इंधन दरवडीमुळे ट्रॅक्टर जेसीबीच्या भाड्यात 25% ची वाढ; बियाणे, खते, औषधे, मजुरीचे दर वाढले
Raigad farming cost increase
Raigad farming cost increasePudhari
Published on
Updated on

संतोष उतेकर

सुधागड: रायगड जिल्ह्यात पावसाला काही दिवसांवर येऊन ठेपल्याने खरिपाच्या कामांची थांब दोन सुरू झाली आहे. शेती ही मातीचे भराव नालेसफाई रस्ते दुरुस्ती आणि बांधकामाची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी ट्रॅक्टर जेसीबी पोकलेन डंपर आणि यासार यंत्रसामग्री मोठी मागणी वाढली आहे.

पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे या यंत्रणाच्या भावात 20 ते 25 टक्केची वाढ झाली आहे. शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक आर्थिक अडचणी सापडले आहेत. रायगडात शेतकरी नांगरणी चिखळणी चपातीकरण आणि पेरणीपूर्व मशागतीच्या कामात व्यस्त आहेत.

Raigad farming cost increase
Raigad Congress crisis: महेंद्र घरत यांची जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी; घरत यांना हटवल्याने रायगड काँग्रेसमध्ये बंड

ग्रामीण भागात पावसाच्या पूर्वीची विविध विकास कामेही वेगाने सुरू असल्याने यंत्रणा सामग्रीची मागणी वाढली आहे. परिणामी यंत्रणा मालकाकडून भाडे दर वाढवण्यात आले आहे. आधीच बियाणे खते औषधे आणि मजुरीचे दर वाढल्याने शेतकरी संकटात असतानाच इंधनधराची वाढीची त्याची चिंता वाढली आहे.

पावसाळा तोंडावर आल्याने कर्ज काढून यंत्रे भाड्याने घ्यावी लागत आहे. दुसरीकडे यंत्रणा मालकाची खर्च वाढल्याने त्यांनी भाडेवाढ अपरिहार्य असल्याचे सांगितले जाते.

Raigad farming cost increase
Raigad kidnapping cases: रायगडमध्ये अल्पवयीन मुलांचे अपहरण वाढले; बेपत्तांमध्ये 77 टक्के मुली

उत्पादन खर्चात वाढ

डिझेल पेट्रोलच्या सतत वाढणाऱ्या दरांमुळे शेतीचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे ट्रॅक्टर पोकलेन आणि जीसीपी सारख्या यंत्रणावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना आता मशागतीसाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत त्यातच बियाणे खते आणि औषधे वाढल्या किमतीमुळे शेती करणे अधिक खर्चिक बनले आहे उत्पादन खर्चाच्या तुलनेत शेतीमाला योग्य दर मिळत असल्याने शेतकऱ्याची आर्थिक कोंडी होत आहे.

डिझेल पेट्रोलच्या प्रचंड भाव वाढीचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे ट्रॅक्टर जेसीबी पोकलेन आणि डंपरच्या भाड्यात वीस ते पंचवीस टक्के ची वाढ झाली आहे आधीच वाढत्या खर्चामुळे शेतकरी हाळातील झाला असताना या भाड्या मुले त्यांचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे.

- शरद गोळे, सचिव सुधागड तालुका कृषी मित्र संघटना

हंगामात पेट्रोल डिझेलचे भाव सतत वाढत आहेत शिवाय त्यांचाही देखील आहे त्यामुळे डिझेल साठी आम्हाला वन वन फिरावे लागते कधी कधी डिझेल भावी काम बंद सुद्धा घ्यावे लागत इंधन दरवाढीमुळे नाईलाजाने आम्हाला भाड्या देखील वाढ करावी लागली आहे.

- निलेश पवार, व्यावसायिक पाली

सध्या मोठ्या प्रमाणात जीसीबी ट्रॅक्टर डंपर अशा वाहनांसाठी डिझेलची मागणी वाढली आहे पावसाळ्यापूर्वीची शेतीची आणि इतर कामे सुरू असल्यामुळे इंधनासाठी हे यंत्रसामग्री मोठ्या प्रमाणात होते

- संदीप जाधव, पेट्रोल पंप व्यावसायिक खुरवले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news