Raigad Fire | बकरी फार्मला भीषण आग; ४०० बकरी, ३५० कबुतरांचा होरपळून मृत्यू

नेरळ–माणगाव रोडवरील फार्ममध्ये भीषण आग
Karjat Mangaon Goat Farm Fire
Karjat Mangaon Goat Farm Fire Pudhari
Published on
Updated on

Karjat Mangaon Goat Farm Fire

कर्जंत : कर्जत तालुक्यातील कर्जत - नेरळ राज्यमार्गावर माणगाव गावच्या हद्दीत असलेल्या गोट फार्ममध्ये भीषण आग लागली. या आगीमध्ये तब्बल ४०० बकऱ्यांचा आणि ३६० कबुतरांचा होरपळून मृत्यू झाला. त्यात या ठिकाणी लागलेली आग ही रात्रीच्या वेळी लागल्याने मदतकार्य मिळण्यात अडचणी आल्याने मोठ्या प्रमाणात बकऱ्यांचा बळी यात गेला आहे.

आगीची तीव्रता इतकी प्रचंड होती की बकऱ्यांना बाहेर काढण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. परिणामी मोठ्या संख्येने मुक्या प्राण्यांचा दुर्दैवी अंत झाला. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news