Raigad Illegal Liquor Action: रायगडमध्ये आठवडाभरात अवैध दारुचे १६५ गुन्हे; पुण्यातील दारूकांडानंतर उत्पादन शुल्कची कारवाई

३८ लाखांचा मुद्देमाल जप्त; १११ आरोपी अटकेत
Raigad Illegal Liquor Action
Raigad Illegal Liquor ActionPudhari
Published on
Updated on

सुवर्णा दिवेकर

अलिबाग: पिंपरी-चिंचवड येथे घडलेल्या विषारी दारू प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्यनिर्मिती आणि तस्करीविरोधात व्यापक कारवाई सुरू केली आहे.

जिल्हाभरात राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत गेल्या आठवडाभरात तब्बल १६५ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून ३८ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Raigad Illegal Liquor Action
BMC Officers Transfer: कित्येक वर्षे एकाच खात्यात अधिकारी कार्यरत; नगरसेवकांच्या प्रश्नाला महानगरपालिका प्रशासनाचे मोघम उत्तर

राज्य उत्पादन शुल्क विभागाने दाखल केलेल्या १६५ गुन्ह्यांपैकी १७ गुन्हे बेवारस स्वरूपाचे असून उर्वरित १४८ गुन्ह्यांमध्ये १११ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

जिल्ह्यात विविध ठिकाणी टाकण्यात आलेल्या धाडींमध्ये २ हजार ८० लिटर हातभट्टीची दारू आणि ८० हजार ४९४ लिटर रसायन जप्त करण्यात आले. याशिवाय ८७.५ बल्क लिटर देशी मद्य, ५ बल्क लिटर विदेशी मद्य तसेच १५ बल्क लिटर बिअर हस्तगत करण्यात आली आहे.

तसेच परराज्यातून रायगडमध्ये आणण्यात आलेले १०४ बल्क लिटर मद्य पकडण्यात उत्पादन शुल्क विभागाला यश आले आहे. कारवाईदरम्यान २९३ लिटर नीरा, १५१ लिटर ताडी आणि २७० किलो काळा गूळही जप्त करण्यात आला. अवैध मद्य वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे एक वाहनदेखील ताब्यात घेण्यात आले आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक रविकिरण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाची विविध पथके जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांवर सातत्याने गस्त घालत आहेत. त्याचबरोबर ग्रामीण, डोंगराळ आणि जंगल परिसरात सुरू असलेल्या गावठी व हातभट्टीच्या दारू व्यवसायावर आळा घालण्यासाठी विशेष धाडसत्र राबविण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news