

खोपोली : ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षणासाठी हारकती घेतल्यावर पुन्हा आरक्षण सोडत मंगळवारी उपविभागीय प्रांताधिकारी प्रकाश सकपाळ यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आले. महिलांसाठी आरक्षण पडल्याने 22 ग्रामपंचायतीवर महिलाराज असणार आहे. तर साजगांव, माडप, वावोशी आदि ग्रामपंचायतीचे आरक्षण बदले आहे.
खालापूर तालुक्यातील 45 ग्राम पंचायतींपैकी 40 ग्रामपंचायतींच्या निवडणुका मागील दोन वर्षांत पूर्ण झाल्या असून उर्वरित 5 ग्राम पंचायतीचे आरक्षण रद्द करण्यात आले आहे. हे थेट सरपंच पदाचे आरक्षण सन 2025 ते 2030 या कालावधीत होणार्या ग्राम पंचायत निवडणुकीसाठी आहे. ग्रुप ग्रामपंचायत साजगांव येथे अनुसूचित जाती तर तुपगाव हे अनुसूचित जाती महिला वर्गासाठी पडले आहे.
अनुसूचित जमातीसाठी माडप, वावोशी, बोरगाव खुर्द, वावर्ले, जांबरुंग तर महिला अनुसूचित जमाती साठी कलोते, नारंगी, वरोसे, उंबरे, दुरशेत या ग्रामपंचायत यांची सोडत निघाली आहे. तर नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिला चावणी, टेंभरी, तांबटी, होनाड, चांभार्ली, शिरवली, नागरिकांच्या मागास प्रवर्ग गोरठण बुद्रुक, ठाणेन्हावे, इसांबे, नंदनपाडा, जांभिवली, देवन्हावे टेंभरी, तांबाटी , या ग्राम पंचायत यांची सोडत निघाली आहे.
सर्व साधारणमधून 21 सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले असून यात महिलांसाठी बिडखुर्द, वडगांव आसरे, नावंढे, वावंढळ, माणकिवली, हाळ खुर्द, सावरोली, वडवळ, लोधीवली या ग्रामपंचायत यांची सोडत निघाली.
खानाव, खरीवली, आपटी, नडोदे, चौक, होराळे, आत्करगांव, चिलठण, मांजगाव, वासंबे, कुंभिवली या ग्राम पंचायत सर्व साधारण जागेसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले. या आरक्षण सोडत जाहीर करताना तहसिलदार अभय चव्हाण, गटविकास अधिकारी संदीप कराड, नायब तहसिलदार सुधाकर राठोड उपस्थित होते.
मागच्या आरक्षण सोडतीत अनेकांचा हिरमोड झाल्यावर हरकती घेतल्यावर पुन्हा आरक्षण सोडतीच्या दरम्यान प्रत्येक ग्रामपंचायतींचे राजकीय पदाधिकारी उपस्थित असल्याने अनेकांची काय आरक्षण पडणार याची उत्सुकता अखेर संपली असून इच्छुक उमेदवार आपआपल्या ग्रामपंचायतीत कामाला लागणार आहेत.
पेण शहर : पेण तालुक्याच्या 64 ग्रामपंचायत सरपंच पदाची आरक्षण सोडत 15 रोजी महडा येथील गुरुकुल शाळेच्या सभागृहात प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसिलदार तानाजी शेजाळ यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आले.
यावेळी तालुक्यात एकमेव अंतोरे ग्रामपंचायत ही अनुसूचित जातीसाठी आरक्षित करण्यात आली असून यातील 14 ग्रामपंचायती अनुसूचित जमातीसाठी त्यापैकी खुल्या गटासाठी गागोदे खुर्द, जोहे, काळेश्री, कणे, कळवे, मसद बुद्रुक, दिव तर दूरशेत, हमरापुर, आमटेम, वाशी, वढाव, जिते, सोनखार या सात ग्रामपंचायती महिलांसाठी राखीव करण्यात आल्या आहेत.यासह नागरिकांचा मागास प्रवर्ग या खुल्या गटासाठी आंबेघर, शेडाशी, वडखळ, मळेघर, बेणसे, खरोशी, कोपर, बोरगाव या आठ ग्रामपंचायती तर यातील महिला प्रवर्गासाठी वरवणे, वरेडी, शिर्की, रोडे, रावे, सापोली, बेलवडे बुद्रुक, कामार्ली, जावळी या नऊ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचा आरक्षण जाहीर करण्यात आला आहे.
यामधील खुला प्रवर्गासाठी आरक्षित ग्रामपंचायत कासू, कुहिरे, दादर, बोरी, काराव, निगडे, दुष्मी, बळवली, तरणखोप, करंबेली छत्तीशी, पाबळ, महलमि-या डोंगर, वरसई, मुंढानी, आंबिवली, बोर्झे या सोळा ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला असून यातील महिला प्रवर्गासाठी जिर्णे, कांदळे, झोतिरपाडा, निधवली, खारपाले, डोलवी, कोलेटी, पाटणोली, कोप्रोली, उंबर्डे, शिहू, सावरसई, करोटी, वाशिवली, वरप, वाकरुळ या सोळा ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यामुळे पेण तालुक्यातील एकूण 64 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत आज जाहीर करण्यात आल्यामुळे येणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये खर्या अर्थाने चुरस निर्माण होणार असल्याचे दिसून येत आहे. तर यावेळी काही ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते चिट्ठी काढून जाहीर करण्यात आली.
मुरुड जंजिरा ः मुरूड तालुक्यातील 24 ग्रामपंचायतीचे सरपंच आरक्षण मुरुड तहसीलदार आदेश डफळ यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती मधील डॉ.ति.श्री. नानासाहेब धर्माधिकारी सभागृहात घेण्यात आली. 12 ग्रामपंचायतींमध्ये महिला राज येणार आहे.
यावेळी तहसीलदार आदेश डफळ, निवासी नायब तहसीलदार संजय तवर, सहाय्यक गटविकास अधिकारी मंगेश पाटील, संजय वानखडे, खुषाल राठोड, पंचायत समिती विस्तार अधिकारी प्रसाद माळी, कृषि विस्तार अधिकारी वसंत दळवी, प्रतिक पावसकर, धनंजय साक्रुडकर व तालुक्यातील राजकीय पक्षांचे कार्यकर्ते पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
यावेळी मुरुड तहसीलदार यांनी 24 ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच आरक्षण 2025 ते 2030 या कालावधीसाठी सरपंच आरक्षण बाबत माहिती दिली. यामध्ये विहुर ग्रामपंचायत थेट सरपंच करिता सोडती शिवाय अनु.जाती महिला आरक्षण घोषित करण्यात आले.
नागरिकांचा मागास प्रवर्ग 17 ग्रामपंचायत सरपंच करिता सर्वच्या समोर प्लास्टिक डब्यात 17 चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. या डब्यातून 4 थीत शिकणारा विद्यार्थी उजेफा शरफात शेख यांनी एक एक करत चिठ्ठ्या उचलल्या. यामध्ये कोर्लेई, मजगाव, शिघ्रे, साळाव, मिठेखार, मांडला तर आंबोली ग्रामपंचायत सोडती शिवाय नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षण घोषित करण्यात आले.
सर्वसाधारण आरक्षण करिता 8 ग्रामपंचायतमधुन तेलवडे, चोरढे या 2 ग्रामपंचायत सोडत करण्यात आली. ग्रामपंचायत सरपंच पदाकरीता अनु. जमाती खुला यामधुन बोर्ली, एकदरा राजपुरी तर ग्रामपंचायत सरपंच पदाकरीता अनु. जमाती महिला करिता वळके व तळेखार असणार आहे. ग्रामपंचायत सरपंच पदाकरीता नागरिकांचा मागास प्रवर्ग खुला कोर्लई, मजगाव, शिघ्रे तर ग्रामपंचायत सरपंच करिता नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आंबोली, साळाव, मिठेखार, मांडला असणार आहे.
ग्रामपंचायत सरपंच पदाकरीता सर्वसाधारण खुला करिता सावली, उसरोली, आगरदांडा, वेळास्ते, काशिद, काकळघर, तर ग्रामपंचायत सरपंच पदाकरीता सर्वसाधारण महिला करिता वावडुंगी, नांदगाव, भोईघर, चोरढे, तेलवडे हे असणार आहे. यावेळी राजकीय पक्षांनी आपल्या समस्या मांडल्या. त्यावर तहसीलदार आदेश डफळ यांनी सकारात्मक उत्तर दिले आणि समस्या दूर केल्या.
म्हसळा : एप्रिल 2024 मध्ये सन 2025 ते 2030 या कालावधी मधील स्थानिक स्वराज्य संस्थाचे सरपंच पदाचे आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली होती. ओबीसी आरक्षणाचे निर्णय प्रकियामुळे ती पुन्हा रद्दबातल ठरल्याने नव्याने 15 जुलै रोजी न्यू इंग्लिश स्कूल सभागृहात म्हसळा तालुक्यातील 39 ग्राम पंचायत मधील सरपंच पदाचे आरक्षण सोडत म्हसळा तहसीलदार सचिन खाडे यांनी जाहीर केले. 39 ग्राम पंचायत पैकी म्हसळा तालुक्यातील 19 ग्राम पंचायत मध्ये महिलाना सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
वरिष्ठांचे आदेशानुसार सन 2011 मध्ये झालेल्या जनगणनेच्या निकषानुसार आरक्षण सोडत करण्यात आले आहे. म्हसळा तालुका मधील 39 ग्राम पंचायत सरपंच पदाचे आरक्षण सोडतीत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्साधारण प्रवर्गातील महिला व खुल्या जागा जाहीर करण्यात आल्या असल्याचे तहसीलदार सचिन खाडे यांनी सांगितले. सरपंच पदाचे आरक्षण सोडत चिठ्ठी अपेक्षा महेश धोत्रे वय वर्षे 6 हिच्या हस्ते काढण्यात आल्या. आरक्षण जाहीर करण्यात आलेली यादी प्रोजेक्टद्वारे फळ्यावर उपस्थिताना दाखविण्यात आली.
वरील प्रमाणे सन 2025 ते 2030 या कालावधीसाठी सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले असल्याचे तहसीलदार सचिन खाडे यांनी घोषणा केली. आरक्षण सोडतीसाठी म्हसळा तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतीचे पुरुष व महिला पदाधिकारी उपस्थित होते. तहसीलदार खाडे यांनी सर्वांचे स्वागत व आभार मानले.
या वेळी त्यांना सहकार्य करण्यासाठी नायब तहसीलदार चंद्रशेखर खोत, महसूल नायब तहसीलदार मृणाली शिरसाठ,श्री धोंडगे, अव्वल कारकून सलीम शहा,तलाठी ठाकरे,महेश रणदिवे आदी कर्मचारी यांनी सहकार्य केले. या आरक्षणामुळे आता राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आता निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.
आरक्षण सोडतीत प्रामुख्याने पाभरे ग्राम पंचायत - अनु.जमाती स्त्री, खारगाव खुर्द - ना मा.प्र., खारगाव बुद्रुक - सर्व साधारण, देवघर - सर्साधारण, जांभुळ -ना मा.प्र., खारगाव बुद्रुक - सर्व साधारण, देवघर - सर्साधारण, जांभुळ - नामाप्र.स्त्री, नेवरूळ - सर्साधारण, घूम सर्वसाधारण स्त्री,केल्टे- नामाप्र, मेंदडी सर्वसाधारण स्त्री, खरसई - सर्वसाधारण, गोंडघर - सर्वसाधारण, वारळ- सर्वसाधारण, तुरूंबाडी - सर्वसाधारण, रोहिणी -नामाप्र, वरवठणे - नामाप्र, रेवळी- नामाप्र स्त्री,साळविंडे - सर्वसाधारण स्त्री, तोंडसुरे - सर्वसाधारण स्त्री, निगडी - सर्वसाधारण स्त्री, कांदलवाडा - नामाप्र स्त्री, घोणसे - सर्वसाधारण स्त्री, चिखलप - सर्वसाधारण, भेकर्याचा कोंड - सर्वसाधारण स्त्री, काळसुरी- सर्वसाधारण स्त्री, खामगाव - अनुसूचित जाती स्त्री, लेप -अनुसूचित जमाती, आंबेत- नामाप्र स्त्री, संदेरी - अनुसूचित जमाती स्त्री, कणघर - सर्वसाधारण, कुडगाव- अनुसूचित जमाती, फळसप - नामाप्र स्त्री, पांगलोळी- सर्व साधारण स्त्री, तोराडी- नामाप्र, कोलवट - सर्व साधारण स्त्री,ठाकरोळी- सर्व साधारण,वावे - सर्व साधारण, मांदाटणे - सर्व साधारण स्त्री,कोळे - अनुसूचित जमाती,आडी महाड खाडी - नामाप्र अशा प्रकारे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.