Raigad Gram Panchayat Election : ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी सकाळच्या सत्रात १६.३९ टक्के मतदान

दिवेआगरमध्ये नीचांकी, तर काशिदमध्ये उत्साहाचे वातावरण
Voting Percentage
Voting Pudhari
Published on
Updated on

Gram Panchayat Polls 2026

रायगड: रायगड जिल्ह्यातील १८ ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रियेला मंगळवारी (दि.२८) सकाळी उत्साहात सुरुवात झाली. सकाळी ७:३० ते ९:३० या पहिल्या दोन तासांच्या कालावधीत सरासरी १६.३९% मतदान झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. यामध्ये महिला मतदारांच्या तुलनेत पुरुषांच्या मतदानाचा टक्का अधिक असल्याचे दिसून आले आहे.

मतदानाची आकडेवारी:

एकूण मतदान: पहिल्या दोन तासांत एकूण १४,२३८ मतदारांपैकी २,३३३ मतदारांनी आपला हक्क बजावला.

पुरुष व महिला मतदान: पुरुषांचे मतदान १८.१६% झाले असून महिला मतदानाची टक्केवारी १४.६४% इतकी आहे.

*सर्वाधिक मतदान:मुरुड तालुक्यातील काशिद ग्रामपंचायतीमध्ये सकाळी ९:३० पर्यंत सर्वाधिक ३०.२४%मतदान झाले. त्यापाठोपाठ खालापूरमधील होराळे येथे ३०.१४% मतदान झाले आहे.

सर्वात कमी मतदान: श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथे सर्वात कमी म्हणजे केवळ १०.१२% मतदान झाले आहे.

Voting Percentage
Raigad Heatwave: सूर्यदेव कोपला, रायगड तापला; उष्णतेच्या लाटेने जनजीवन होरपळले

तालुकानिहाय मतदानाची टक्केवारी (सकाळी ९:३० पर्यंत)

तालुका ग्रामपंचायत मतदान टक्केवारी (%)

मुरुड काशिद - मांडला - ३०.२४ % (काशिद सर्वाधिक)

महाड - मोहोप्रे, ताम्हाणे, वराठी २१.९४ % (मोहोप्रे)

पोलादपूर - महालगुर २०.५५ %

अलिबाग - नागाव, खंडाळे १५.११ % (नागाव) |

कर्जत - पाली तर्फे कोतल १५.५ %

म्हसळा - तुभे बु., घोणसे २९.४५% (तुभे बु.) |

रोहा - पुई १४.२६ %

सकाळच्या सत्रात काही ठिकाणी मतदारांच्या रांगा पाहायला मिळाल्या, तर काही दुर्गम भागांत मतदानाचा वेग काहीसा मंद होता. अलिबाग तालुक्यातील नागाव (१५.११%) आणि खंडाळे (१३.५८%) येथे मतदारांनी संमिश्र प्रतिसाद दिला आहे. दुपारच्या सत्रात मतदानाचा हा टक्का वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news