Raigad fort closed | किल्ले 'रायगड'च्या पायरी मार्गावर दगड आल्याने मार्ग झाला बंद

शिवभक्तांनी सद्यस्थितीमध्ये या मार्गावरून प्रवास करू नये; असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे
Raigad fort closed | किल्ले 'रायगड'च्या पायरी मार्गावर दगड आल्याने मार्ग झाला बंद
Published on
Updated on

इलियास ढोकले

नाते : हिंदवी स्वराज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडच्या पायरी मार्गावर महादरवाजा ते मदार मोर्चा दरम्यान दगड खाली आला आहे. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असल्याची माहिती महाड तहसील कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे.

Raigad fort closed | किल्ले 'रायगड'च्या पायरी मार्गावर दगड आल्याने मार्ग झाला बंद
Sambhajiraje Chhatrapati Raigad statement | दुर्गराज रायगडचे संपूर्ण संवर्धन झाल्याशिवाय रायगड सोडणार नाही; युवराज संभाजीराजे छत्रपती

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत पायरी मार्गावर आलेले दगड बाजूला करण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. याकरता लागणारा वेळ लक्षात घेता शिवभक्तांनी सद्यस्थितीमध्ये या मार्गावरून प्रवास करू नये; असे आवाहन बांधकाम विभाग व स्थानिक प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

Raigad fort closed | किल्ले 'रायगड'च्या पायरी मार्गावर दगड आल्याने मार्ग झाला बंद
Raigad Fort Security: किल्ले रायगडावरील ५४ सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा कार्यान्वित; काही महिन्यांपासून बंद होती यंत्रणा

येत्या शनिवारी 27 जून रोजी तिथीनुसार किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा 353 वा शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर झालेल्या या घटनांमुळे बांधकाम विभागाने या संदर्भात अधिक खबरदारी घ्यावी अशी अपेक्षा शिवभक्त व स्थानिक ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news