Raigad Fort : किल्ले रायगडच्या संवर्धनासाठी 345 कोटी; 147 कोटी रुपयांची कामे पूर्ण

प्राधिकरणामार्फत नियोजनात्मक कामे प्रगतीपथावर!; जिजाऊंंचा वाडा संवर्धित करावा
Raigad Fort conservation project
किल्ले रायगडच्या संवर्धनासाठी 345 कोटी; 147 कोटी रुपयांची कामे पूर्ण pudhari photo
Published on
Updated on

महाड : श्रीकृष्ण बाळ

हिंदवी स्वराज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडच्या जतन व संवर्धन कामी 20 डसेंबर 2017 रोजी स्थापन करण्यात आलेल्या रायगड प्राधिकरणाच्या एकूण जाहीर झालेल्या प्रकल्पासह करिता 606 कोटीचा प्रकल्प राज्य शासनाने मंजूर केला असून यापैकी आता पावे तो 345 कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. अशी माहिती कार्यकारी अभियंता विशेष स्थापत्यपथक मार्ग प्रकल्प विभाग महाडच्या वतीने स्वप्निल बुरले यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

रायगड प्राधिकरणामार्फत करण्यात आलेल्या जतन व संवर्धनाच्या कामांमध्ये गंगासागर तलाव हत्ती तलाव यांच्यातील तलावा मधील गळीत असणारी कामे पूर्ण करण्यात आली असून आता या तलावामध्ये शंभर टक्के पाणी साठा केला जात आहे. याशिवाय चित्तदरवाज्यापासून मुख्य पायरी मार्गाची कामे पूर्ण करण्यात आली असून सद्यस्थितीमध्ये महादरवाजा खूबलढा बुरुज व वाघ दरवाज्याची जतन व संवर्धनाची प्रमुख कामे हाती घेण्यात आली आहेत.

Raigad Fort conservation project
सांगली : स्थायी सभापतिपदासाठी भाजपतर्फे धीरज सूर्यवंशी

दरम्यान किल्ले रायगड व परिसरात रायगड प्राधिकरणाच्या मार्फत केंद्रीय पुरातत्व विभागाच्या मंजुरीने सुरू असलेल्या विकास कामांमध्ये पाचाड येथील राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांच्या वाड्याचे देखील जतन व संवर्धन ऐतिहासिक पद्धतीने व्हावे अशी मागणी स्थानिक शिवभक्तांकडून करण्यात येत आहे. यासंदर्भात या राजवाड्याची असलेल्या सद्यस्थितीबाबत दैनिक पुढारीने या आधीच वस्तुनिष्ठ वृत्त प्रसिद्ध केले होते.

रायगड प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी वीस डिसेंबर 2017 रोजी संभाजी राजे छत्रपती यांची नियुक्ती करण्यात आल्यावर या कामांना गती प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले असून सद्यस्थितीमध्ये किल्ले रायगड व या परिसरातील 24 गावांमधील कामांसाठी पुरातत्व वास्तु विशारद वरुण बामरे यांच्याकडून संबंधित कामांवर दैनंदिन स्वरूपात देखरेख ठेवली जात आहे.

Raigad Fort conservation project
Illegal Liquor Seized : राज्य उत्पादन विभागाने पकडली अवैध दारू

या कामांसंदर्भात त्यांच्याशी दैनिक पुढारी करिता विचारणा केली असता त्यांनी स्पष्ट केले की, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागा कडून परवानगी प्राप्त झालेल्या कामांची सुरुवात यावर्षी करण्यात आलेली आहे त्यात प्रामुख्याने फुटका तलाव एक, दोन, तीन याच्या गळती काढण्याचे व जतन संवर्धनाचे काम महा दरवाजा तटबंदी, वाघ दरवाजा व तटबंदी हिरकणी बुरुज, खूब लढा बुरुज, नाणे दरवाजा यांचे जतन संवर्धन तसेच नवीन जागी टॉयलेट्स, बेबी केअर युनिट, टुरिस्ट गाईड शेड इत्यादी कामे सुरू करण्यात आली आहेत.

Raigad Fort conservation project
Dona Paula Jetty Goa | पतीशी भांडण अन् टोकाचं पाऊल; गोव्याच्या दोनापावला जेटीवर महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

फुटका तलाव एक दोन तीन यामध्ये गळती काढण्याचे काम सुरू आहे त्यात प्रामुख्याने गळती दिसून आलेल्या ठिकाणी ग्राऊटिंग चे काम व तलावांच्या बाहेरील भिंतीचे बरेचसे दगड निखळून पडले होते. त्याचे रिसेटींगचे काम मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे शास्त्रोक्त पद्धतीने केले जात आहे.

176 कामांची पूर्तता

किल्ले रायगडावरील रायगड प्राधिकरणाच्या एकूण 277 कामांना मंजुरी मिळाली असून यापैकी 176 कामे पूर्ण झाली आहेत. 95 कामे प्रगतीपथावर असून 11 कामे निविदास्तरीय असल्याची माहिती बुरले यांनी दिली आहे. आत्ता पावेतो प्राप्त 345 कोटी 71 लाख रुपयांच्यानिधीपैकी सुमारे 147 कोटी 19 लक्ष रुपयांची कामे पूर्ण झाली असून 281 कोटी रुपये शिल्लक असल्याचेही सांगण्यात आले. प्राधिकरणाच्या स्थापनेची घोषणा होण्याअगोदर 31 मार्च 2017 रोजी वरील 277 कामां संदर्भात नियोजन करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news