Raigad Fort | किल्ले रायगडची इत्थंभूत माहिती प्रतिकृती देणार

बंदोबस्तासाठी येणार्‍या पोलिसांना ठरणार मार्गदर्शक; दहा महिन्यांच्या परिश्रमानंतर साकारली प्रतिकृती
महाड (रायगड)
यासाठी महाडचे उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांच्या कार्यालयाने किल्ले रायगडची भव्य प्रतिकृती तयार करुन घेतली आहे. Pudhari News Network
Published on
Updated on

महाड (रायगड) : किल्ले रायगडावर वर्षभरात होणारे विविध उत्सव व कार्यक्रमासाठी होणारी अलोट गर्दी त्यासाठी असणार्‍या पोलिस बंदोबस्तासाठी बाहेरून येणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना किल्ले रायगडची माहिती व्हावी, यासाठी महाडचे उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांच्या कार्यालयाने किल्ले रायगडची भव्य प्रतिकृती तयार करुन घेतली आहे.

Summary

किल्ले रायगडवर बंदोबस्तासाठी बाहेरुन येणार्‍या पोलीस, अधिकारी आणि कर्मचार्‍यांना किल्ले रायगडची माहिती करुन घेण्यासाठी ही प्रतिकृती उपयुक्त ठरेल असा विश्वास महाडचे उपविभागिय पोलीस अधिकारी शंकर काळे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

प्रतिकृती कुठेही हलविता येणे शक्य

जे.जे. स्कूल ऑफ आर्टसमधून कलाशिक्षण घेतलेल्या मिरज (जिल्हा सांगली) येथील शिल्पसंकल्प आर्टचे शिल्पकार अमोल सूर्यवंशी आणि रसिका लाटणे या दोघांनी दहा महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर ही प्रतिकृती साकारली आहे. ही प्रतिकृती पंधरा फूट लांब, आठ फूट रुंद आणि चार फूट उंचीची आहे. किल्ले रायगडचा डोंगर आणि गडावरील वास्तू आणि ठिकाणे या प्रतिकृतीमध्ये अत्यंत बारकाईने साकारण्यात आले आहेत.

ही प्रतिकृती आधी मातीचा साचा तयार करून नंतर प्लास्टीकचा वापर करून बनविण्यात आली आहे. प्रतिकृतीचे विविध भाग सुटे करून पुन्हा जोडता येत असल्याने ही प्रतिकृती कुठेही हलविता येणे शक्य आहे. प्रतिकृतीसाठी वापरण्यात आलेले प्लास्टीक मजबूत असल्याने अनेक वर्ष ही प्रतिकृती टिकणार आहे.

प्रतिकृतीसाठी सात लाख रुपये खर्च

महाडचे उपविभागिय पोलीस अधिकारी शंकर काळे यांनी बुधवारी सायंकाळी नवीन पोलीस वसाहतीमधील कम्युनिटी हॉलमध्ये या प्रतिकृतीची माहिती पत्रकारांना दिली. किल्ले रायगडवर बाहेरुन येणार्‍या पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांना किल्ले रायगड परिसराची आणि गडावरील ठिकाणांची माहिती नसते. त्यामुळे त्यांना गडावर कोणते ठिकाण बंदोबस्तासाठी नेमून दिले आहे, याची माहिती देण्यासाठी कार्यक्रमाच्या दोन चार दिवस आधी स्थानिक कर्मचारी बरोबर घेवून त्यांना आपले बंदोबस्ताचे ठिकाण आणि त्या ठिकाणची आपली जबाबदारी समजून घ्यावी लागते. आता ती सर्व माहिती या पोलिसांचा महाड किंवा गडाच्या पायथ्याशी पाचाड येथे असलेल्या पोलीस चौकीत या पोलीस कर्मचार्‍यांना देता येणार आहे. त्यामुळे गडावर जावून माहिती घेणे, परत येवून पुन्हा गडावर जाण्याचा वेळ वाचणार आहे. किल्ले रायगडची ही प्रतिकृती तयार करण्यासाठी सात लाख रुपये खर्च आला. त्यासाठी महाड औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांनी आर्थिक सहकार्य केल्याचे शंकर काळे यांनी सांगितले. गडावर कार्यक्रम नसताना ही प्रतिकृती पाचाड पोलीस चौकीत ठेवायची, महाडमध्ये ठेवायची की अलिबाग येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात ठेवायची याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आम्ही आजवर अनेक शिल्पे बनवली. पण एखाद्या किल्ल्याची प्रतिकृती आम्ही प्रथमच बनवित होतो. हे काम आव्हानात्मक होते. मात्र डीवायएसपी शंकर काळे आणि पोलिसांनी किल्ले रायगडच्या भौगोलिक आणि नैसर्गिक बारकावे आम्हाला तपशीलवार उपलब्ध करून दिले. प्रसंगी ड्रोनचाही वापर करून तपशिल उपलब्ध करून दिला. त्यामुळे ही प्रतिकृती साकारणे सोपे गेली.

अमोल सूर्यवंशी, शिल्पकार, मिरज, जि. सांगली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news