

सुधागड ः सुधागड तालुक्यात वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा यामुळे नागरिक व व्यावसायिक हैराण झाले आहे. त्यातच दरोडे व चोरीच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे विजपुरवठा सुरळीत ठेवावा अशी मागणी सुधागड तालुका मनसेने केली आहे. याबाबतचे निवेदन बुधवारी (ता. 6) पाली वीज वितरण कार्यालयाला तालुका अध्यक्ष सुनील साठे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. विजपुरवठा सुरळीत झाला नाही तर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
या निवेदन म्हंटले आहे की सतत खंडित होणार्या वीज पुरवठ्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. कुठलेही ठोस कारण नसतांना हकनाक विजपुरवठा खंडित केला जातो. शिवाय याबाबत महावितरण कडून योग्य माहिती देखील दिली जात नाही. हातोंड, गोंदाव व माठळ येथे पडलेला दरोडा पाहता सुधागड तालुक्यात भितीचे वातावरण आहे.
सतत वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे अनेकांची इलेक्ट्रिक उपकरणे खराब होत आहेत. तसेच अनेक व्यावसायिकांना फटका बसत आहे. विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यात अडचण येत आहेत. म्हणून यावर ठोस उपाययोजना करावी या संदर्भात कार्यकारी उपअभियंता श्री. चित्रे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मनसे तालुका अध्यक्ष सुनील साठे, उप तालुका अध्यक्ष केवल चव्हाण, चव्हाणवाडी शाखा अध्यक्ष परेश वनगले व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.