Raigad | रायगड जिल्ह्याला अमलीपदार्थ तस्करीचा विळखा

३३३ कोटीहून अधिक किमतीचा साठा जप्त
 drug trafficking
रायगड जिल्ह्याला अमलीपदार्थ तस्करीचा विळखाfile photo

अलिबाग : रमेश कांबळे

मुंबईला लागून असलेल्या रायगड जिल्ह्याला अंमली पदार्थ तस्करीचा विळखा बसला आहे. गेल्या १७ महिन्यात ३३३ कोटी ३६ लाख ४८ हजार ८०८ रुपये किमतीचे अमली पदार्थ रायगड पोलीसांनी केलेल्या कारवाईत जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी एकूण ३० गुन्हे दाखल करण्यात आले असून एकूण ४० जणांना अटक करण्यात आली आहे.

जप्त करण्यात आलेल्या या अमली पदार्थांमध्ये मेफेड्रॉन, गांजा, आणि चरस या अंमली पदार्थांचा समावेश आहे. रायगड जिल्ह्यातून परदेशातही अंमली पदार्थांची तस्करी सुरू झाल्याची धक्कादायक बाब खालापूर तालुक्यांत अमली पदार्थ तयार बेकायदा कारखानाच समोर आल्याने उघडकीस आले होते. गतवर्षी रायगडच्या समुद्र किनाऱ्यावर अफगाण चरसची पाकीटे वाहून आली होती.

अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन तालुक्यातील किनाऱ्यावर ही पाकिटे सापडली होती. यामध्ये १ किलो १०० ग्रॅमवजनाची १८५ पाकीटांचा यात समावेश होता. ज्याची किंमत ८ कोटी २५ लाख ११ हजार रुपये होती. या प्रकरणी अलिबाग, रेवदंडा, श्रीवर्धन पोलीस ठाण्यात गुन्हेही दाखल झाले. पोलीस यंत्रणेसह, केंद्रीय तपास यंत्रणांनी या चरस प्रकरणांचा तपास सुरू केला होता. पण तरिही ही पाकीटे कुठून आली याचा शोध अजूनही लागू शकलेला नाही. त्दनंतर रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील ढेकू येथे एका इलेक्ट्रीक पोल बनविण्याच्या कारखान्यात बेकायदेशीरपणे मेफेड्रॉन अर्थात एमडी हा प्रतिबंधीत अंमलीपदार्थ तयार केला जात असल्याचे समोर आले. पोलीसांनी सुरवातीला धाड टाकून ८५ किलो वजनाचे १०७ कोटी रुपये किमतीचे मेफेड्रॉन जप्त करण्यात आले होते.

रायगडच्या किनारपट्टीवर ३१ वर्षापासून तस्करीचा शिक्का

गेल्या ३१ वर्षापूर्वी सन १९९३ मध्ये रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यांतील शेखाडी किनारपट्टीत अतिसंहारक आरडीएक्स स्फोटकांची देशातील पहिली बेकायदा तस्करी झाली. पाकीस्तानातून आयात धालेली ही स्फोटके देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत पोहोचली आणि पाकीस्तानी अतिरेक्यांनी मुंबई शहरात साखळी स्फोट घडवून आणून मोठा विद्धंस केला. परिणामी बेकायदा तस्करीच्या या निमीत्ताने रायगडची किनारपट्टी सर्वप्रथम बदनाम झाली. त्यानंतर जेएनपीटी बंदरातून आयात व निर्यात होणारे अमली पदार्थ तर हवाईमार्गे नायजेरीयन नागरिकांच्या माध्यमातून रायगडात झालेली अमली पदार्थांची आयात यामुळे पून्हा रायगडच्या वाट्याला बदनामी आली आहे.

रायगड जिल्ह्यातील महाविद्यालय, शाळेत जावून अंमली पदार्थ विरोधात विद्यार्थ्याचे प्रबोधन करण्यात येत आहे. तसेच रायगड जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधात कारवाया या मोठ्या प्रमाणत करण्यात आल्या आहेत.

सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news