Raigad Water Crisis : रायगड जिल्ह्यातील २८ धरणक्षेत्रात ३८.२३ टक्के पाणीसाठा

सुधागडमधील ढोकशेत धरणाने गाठला तळ
Raigad Water Crisis
रायगड जिल्ह्यातील २८ धरणक्षेत्रात ३८.२३ टक्के पाणीसाठा
Published on
Updated on

रोहे : रायगड जिल्ह्यातील २८ धरण क्षेत्रात ३८.२३ टक्के पाणीसाठा उपलब्ध असून सूर्य आग ओकत असल्याने पाणीसाठा घटण्याचा वेग वाढला आहे. अजूनही पाऊस सुरू होण्यासाठी दोन महिने शिल्लक आहे.त्यामुळे पाणी जपून वापरण्याची आवश्यकता आहे.

रायगड जिल्ह्यातील २८ धरणांनपैकी २० धरणात ५० टक्यांपेक्षा कमी पाणीसाठा उपलब्ध आहे. जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील ढोकशेत धरणक्षेत्रात पाणीसाठ्याने तळ गाठला असून या धरण क्षेत्रात ० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. जिल्ह्यातील २ धरणात १० टक्केपेक्षा कमी पाणीसाठा उपलब्ध आहे.

रायगड जिल्ह्यातील २८ धरण क्षेत्रातील पाणीसाठा पाहता यामध्ये मुरुड तालुक्यातील फणसाड धरणक्षेत्रात ३५ टक्के, तळा तालुक्यातील वावा धरणक्षेत्रात ७३ टक्के, रोहा तालुक्यातील सुतारवाडी धरणक्षेत्रात ६३ टक्के पाणीसाठा तर पेण तालुक्यातील आंबेघर धरणक्षेत्रात ६५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. अलिबाग तालुक्यातील श्रीगांव धरणक्षेत्रात ३३ टक्के तर सुधागड तालुक्यातील धरणक्षेत्रात कोंडगाव धरणक्षेत्रात २१ टक्के, घोटवडे धरणक्षेत्रात ६ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. ढोकशेत धरणक्षेत्रात ० टक्के, कवेळे धरणक्षेत्रात १७ टक्के, उन्हेरे धरणक्षेत्रात ५ टक्के, श्रीवर्धन तालुक्यातील कार्ले धरणक्षेत्रात ४६ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. कुडकी धरणक्षेत्रात ४६ टक्के, रानीवली धरणक्षेत्रात १८ टक्के, म्हसळा तालुक्यातील पाभरे धरणक्षेत्रात ३६ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. संदेरी धरणक्षेत्रात ६३ टक्के तर महाड तालुक्यातील वरंध धरणक्षेत्रात ४४ टक्के, तर खिंडवाडी धरणक्षेत्रात ४७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. कोथुर्डे धरणक्षेत्रात ३४ टक्के, खैरे धरणक्षेत्रात ४३ टक्के, कर्जत तालुक्यातील साळोख धरणक्षेत्रात ३१ टक्के, अवसरे धरणक्षेत्रात ३० टक्के, खालापुर तालुक्यातील भिलवले धरणक्षेत्रात ५१ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. कलोते मोकाशी धरणक्षेत्रात ४७ टक्के, डोणवत धरणक्षेत्रात ३५ टक्के, पनवेल तालुक्यातील मोरबे धरणक्षेत्रात ६१ टक्के, बामणोली धरणक्षेत्रात ५१ टक्के, उसरण धरणक्षेत्रात ५१ टक्के तर उरण तालुक्यातील पुनाडे धरणक्षेत्रात २१ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news