Raigad Water Storage: रायगडमधील धरणांमध्ये फक्त 21 टक्के पाणीसाठा; गेल्या वर्षीच्या तुलनेत सात टक्के अधिक घट

83 गावे-258 वाड्यांना टंचाईच्या झळा; मान्सूनच्या पावसाची प्रतीक्ष
Raigad Water Storage
Raigad Water StoragePudhari
Published on
Updated on

महादेव सरसंबे

रोहे: रायगडकर पावसाच्या प्रतीक्षेत असताना रायगड जिल्ह्यातील धरण क्षेत्रातील पाणीसाठा घटले आहे. रायगड पाटबंधारे विभागा अंतर्गत येत असलेल्या जिल्ह्यात सरासरी 20.72 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.मागील वर्षी (2025 ) याच दिवशी 28.06 टक्के पाणीसाठा उपलब्ध होता.

जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील फणसाड धरणाने तळ गाठले आहे तर जिल्ह्यात सर्वाधिक पाणीसाठा तळा तालुक्यातील वावा धरणक्षेत्रात 53 टक्के एवढा आहे.

Raigad Water Storage
Abhay Bang Pudhari Maha Icon: आता ‘आरोग्य स्वराज्य’ हवे : डॉ. अभय बंग

जिल्ह्यातील 10 टक्के पेक्षा कमी पाणीसाठा असलेल्या अत्यल्प पाणीसाठा उपलब्ध असलेल्या धरणांमध्ये घोटवडे 4 टक्के, ढोकशेत 2 टक्के, उन्हेरे 4 टक्के, रानीवली 8 टक्के, पाभरे 6 टक्के, बामणोली 2 टक्के, पुनाडे 7 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.जिल्ह्यातील 6 धरणक्षेत्रात 10 ते 20 टक्के दरम्यान पाणीसाठा उपलब्ध आहे

रायगड जिल्ह्यातील 28 धरण क्षेत्रातील पाणीसाठा पाहता यामध्ये मुरुड तालुक्यातील फणसाड धरणक्षेत्रात 0 टक्के पाणीसाठा उपलब्ध,तळा तालुक्यातील वावा धरणक्षेत्रात 53 टक्के पाणीसाठा उपलब्ध, रोहा तालुक्यातील सुतारवाडी धरणक्षेत्रात 40 टक्के पाणीसाठा उपलब्ध, पेण तालुक्यातील आंबेघर धरणक्षेत्रात 42 टक्के पाणीसाठा उपलब्ध, अलिबाग तालुक्यातील श्रीगांव धरणक्षेत्रात 12 टक्के पाणीसाठा उपलब्ध, सुधागड तालुक्यातील कोंडगाव धरणक्षेत्रात 12 टक्के पाणीसाठा उपलब्ध, घोटवडे धरणक्षेत्रात 4 टक्के पाणीसाठा उपलब्ध.

ढोकशेत धरणक्षेत्रात 2 टक्के पाणीसाठा उपलब्ध, कवेळे धरणक्षेत्रात 11 टक्के पाणीसाठा उपलब्ध, उन्हेरे धरणक्षेत्रात 4 टक्के पाणीसाठा उपलब्ध, श्रीवर्धन तालुक्यातील कार्ले धरणक्षेत्रात 28 टक्के पाणीसाठा उपलब्ध, कुडकी धरणक्षेत्रात 27 टक्के पाणीसाठा उपलब्ध, रानीवली धरणक्षेत्रात 8 टक्के पाणीसाठा उपलब्ध, म्हसळा तालुक्यातील पाभरे धरणक्षेत्रात 6 टक्के पाणीसाठा उपलब्ध, संदेरी धरणक्षेत्रात 33 टक्के पाणीसाठा उपलब्ध.

Raigad Water Storage
Farmer Waiting for Rain: खाडीपट्ट्यातील शेतकऱ्यांना लागली पावसाची आस

महाड तालुक्यातील वरंध धरणक्षेत्रात 28 टक्के पाणीसाठा उपलब्ध, खिंडवाडी धरणक्षेत्रात 29 टक्के पाणीसाठा उपलब्ध, कोथुर्डे धरणक्षेत्रात 23 टक्के पाणीसाठा उपलब्ध, खैरे धरणक्षेत्रात 25 टक्के पाणीसाठा उपलब्ध, कर्जत तालुक्यातील साळोख धरणक्षेत्रात 18 टक्के पाणीसाठा उपलब्ध, अवसरे धरणक्षेत्रात 17 टक्के पाणीसाठा उपलब्ध, खालापूर तालुक्यातील भिलवले धरणक्षेत्रात 40 टक्के पाणीसाठा उपलब्ध, कलोते मोकाशी धरणक्षेत्रात 23 टक्के पाणीसाठा उपलब्ध.

डोणवत धरणक्षेत्रात 17 टक्के पाणीसाठा उपलब्ध, पनवेल तालुक्यातील मोरबे धरणक्षेत्रात 38 टक्के पाणीसाठा उपलब्ध, बामणोली धरणक्षेत्रात 2 टक्के पाणीसाठा उपलब्ध,उसरण धरणक्षेत्रात 33 टक्के पाणीसाठा उपलब्ध,उरण तालुक्यातील पुनाडे धरणक्षेत्रात 7 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

1 लाख 31 हजार 99 नागरिकांची वणवण

1 जून अखेर जिल्ह्यात एकूण 70 टँकर कार्यरत असून त्याद्वारे 73 गावे व 258 वाड्यांमधील 1 लाख 31 हजार 99 नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व टँकर खासगी स्वरूपातील असून शासकीय टँकर अथवा मदतीचे टँकर कार्यरत नाहीत. सर्वाधिक टंचाईग्रस्त परिस्थिती पेण तालुक्यात असून येथे 9 गावे व 76 वाड्यांसाठी 12 टँकर कार्यरत आहेत. या माध्यमातून 24 हजार 746 नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news