

यावर्षी रायगड जिल्ह्यात मुबलक पाऊस पडला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात चांगला पाणीसाठा उपलब्ध आहे. रायगड जिल्ह्यातील 28 धरण क्षेत्रात सरासरी 94.53 टक्के पाणीसाठा उपलब्ध असून यापैकी 18 धरणक्षेत्रात 100 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.28 पैकी 17 धरणक्षेत्रात कमी अधिक प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
रायगड जिल्ह्यातील 28 धरण क्षेत्रातील पाण्याचा साठा पाहील्यास मुरुड तालुक्यातील फणसाड धरणक्षेत्रात 100 टक्के पाणीसाठा उपलब्ध पाण्याचा विसर्ग सुरू, तळा तालुक्यातील वावा धरणक्षेत्रात 100 टक्के पाणीसाठा उपलब्ध पाण्याचा विसर्ग सुरू, रोहा तालुक्यातील सुतारवाडी धरणक्षेत्रात 100 टक्के पाणीसाठा उपलब्ध पाण्याचा विसर्ग सुरू, पेण तालुक्यातील आंबेघर धरणक्षेत्रात 91 टक्के पाणीसाठा उपलब्ध, अलिबाग तालुक्यातील श्रीगाव धरणक्षेत्रात 95 टक्के पाणीसाठा उपलब्ध, सुधागड तालुक्यातील कोंडगाव धरणक्षेत्रात 100 टक्के पाणीसाठा उपलब्ध विसर्ग सुरू, घोटवडे धरणक्षेत्रात 100 टक्के पाणीसाठा उपलब्ध पाण्याचा विसर्ग सुरू, ढोकशेत धरणक्षेत्रात 100 टक्के पाणीसाठा उपलब्ध पाण्याचा विसर्ग सुरू, कवेळे धरणक्षेत्रात 100 टक्के पाणीसाठा उपलब्ध पाण्याचा विसर्ग सुरू, उन्हेरे धरणक्षेत्रात 100 टक्के पाणीसाठा उपलब्ध पाण्याचा विसर्ग सुरू, श्रीवर्धन तालुक्यातील कार्ले धरणक्षेत्रात 89 टक्के पाणीसाठा उपलब्ध, कुडकी धरणक्षेत्रात 100 टक्के पाणीसाठा उपलब्ध पाण्याचा विसर्ग सुरू, रानीवली धरणक्षेत्रात 87 टक्के पाणीसाठा उपलब्ध, म्हसळा तालुक्यातील पाभरे धरणक्षेत्रात 100 टक्के पाणीसाठा उपलब्ध पाण्याचा विसर्ग सुरू, संदेरी धरणक्षेत्रात 100 टक्के पाणीसाठा उपलब्ध, महाड तालुक्यातील वरंध धरणक्षेत्रात 100 टक्के पाणीसाठा उपलब्ध पाण्याचा विसर्ग सुरू, खिंडवाडी धरणक्षेत्रात 100 टक्के पाणीसाठा उपलब्ध पाण्याचा विसर्ग सुरू, कोथुर्डे धरणक्षेत्रात 100 टक्के पाणीसाठा उपलब्ध पाण्याचा विसर्ग सुरू, खैरे धरणक्षेत्रात 100 टक्के पाणीसाठा उपलब्ध पाण्याचा विसर्ग सुरू, कर्जत तालुक्यातील साळोख धरणक्षेत्रात 65 टक्के पाणीसाठा उपलब्ध, अवसरे धरणक्षेत्रात 71 टक्के पाणीसाठा उपलब्ध,खालापूर तालुक्यातील भिलवले धरणक्षेत्रात 100 टक्के पाणीसाठा उपलब्ध पाण्याचा विसर्ग सुरू, कलोते मोकाशी धरणक्षेत्रात 100 टक्के पाणीसाठा उपलब्ध पाण्याचा विसर्ग सुरु, डोणवत धरणक्षेत्रात 100 टक्के पाणीसाठा उपलब्ध पाण्याचा विसर्ग सुरू, पनवेल तालुक्यातील मोरबे धरणक्षेत्रात 92 टक्के पाणीसाठा उपलब्ध, बामणोली धरणक्षेत्रात 89 टक्के पाणीसाठा उपलब्ध, उसरण धरणक्षेत्रात 89 टक्के पाणीसाठा उपलब्ध, उरण तालुक्यातील पुनाडे धरणक्षेत्रात 79 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे असे एकूण रायगड जिल्ह्यातील रायगड पाटबंधारे विभाग कोलाड अंतर्गत येत असलेल्या 28 धरण क्षेत्रात 94.53 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.17 धरणक्षेत्रात कमी अधिक प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
रायगड जिल्हयात वर्षी पावसाचे प्रमाण समाधानकारक राहिले आहे. त्यामुळे जिल्हयातील बहुतांश धरणे फुल झाली आहे. जिल्हयात अद्यापही पाऊस होत आहे. त्यामुळे धरण साठा अधिक काळ टिकण्यात मदत होणार आहे. जिलह्यात दरवर्षी कोलाड लघुपाटबंधारे विभागात येणार्या 28 धरणांपैकी काही धरणांचा पाणी साठा एप्रिल-मे या काळात कमी होतो. तर जूनपर्यंत काही धरणे कोरडी पडतात. धरणांमधील गेली अनेक वर्षे गाळ काढलेला नसल्याने ही धरणांची पाणी साठवण क्षमता दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे जिलह्यात पुरेशी धरणे आणि प्रचंड पाऊस होऊन उन्हाळ्यात धरणांमध्ये पुरेसा पाणी साठा उपलब्ध होत नाही. परिणामी जिल्ह्याच्या अनेक भागात तीव्र पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागते.
जिल्हयातील काही धरणाद्वारे उन्हाळी शेतीसाठी सिंचन होत असते. यामुळे शेतकर्यांना उन्हाळ्यात विविध प्रकारची पिके घेता येतात. ज्या भागात धरणांचा साठा मे महिन्यापर्यंत असते तेथील शेतकरी विविध प्रकारची पिके घेतात. त्यामुळे सिंचनाच्या दृष्टीनेही जिल्हयातील धरणांतील पाणी साठा महत्वाचा आहे. सध्या परतीचा पाऊस लांबल्याने धरणांची पाणी पातळी अधिक काळ टिकण्यास मदत झाली आहे.
रायगड जिल्ह्यातील ज्या भागात धरणांचा साठा मे महिन्यापर्यंत असते तेथील शेतकरी विविध प्रकारची पिके घेतात. त्यामुळे सिंचनाच्या दृष्टीनेही जिल्हयातील धरणांतील पाणी साठा महत्वाचा आहे. सध्या परतीचा पाऊस लांबल्याने धरणांची पाणी पातळी अधिक काळ टिकण्यास मदत झाली आहे. यावर्षी जिल्हयात पाणी टंचाईच्या झळा कमी बसण्याची शक्यता आहे.